

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षणाचा लढा सुरू असून सध्या अधिवेशन सुरू आहे , आरक्षण मिळण्याची चांगली संधी आता आहे, आरक्षण मिळाले नाही तर आपण दहा वर्ष मागे जावू त्यामुळे समाजबाधवांनी एकजूट व्हावे, नेत्यांनी समाजाच्या पाठीमागे उभे राहावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी नांदेड येथील सभेत बोलताना केले. Manoj Jarange -Patil
मनोज जरांगे पाटील यांच्या पाच सभा जिल्ह्यात आयोजित करण्यात आल्या होत्या . गुरूवारी मुदखेड तालुक्यातील बारड येथे त्यांची पहिली सभा पार पडली. शुक्रवार दि.8 रोजी शहरापासून जवळच असलेल्या वाडी पाटी जिजाऊनगर येथे दुसरी सभा पार पडली. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. गरजवंतांच्या लढ्यात जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येने समाजबांधव जिजाऊनगरीत आले होते. Manoj Jarange -Patil
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आजपर्यंत मराठा समाजाने खूप वेदना सोसल्या असून आजपर्यंत समाजाला नेत्यांकडून खोटे बोलण्यात आले आहे.आता आरक्षणाचा लढा अंतिम टप्यात आला आहे. नेत्यांनी आता तरी समाजाच्या मागे उभे राहावे, खासदार, आमदारांनी समाजाच्या पाठीशी उभे राहावे, समाज त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, जर आता ते पाठीमागे उभे राहिले नाहीत तर या नेत्यांना समाज आयुष्यभर माफ करणार नाही, त्यांनी पुन्हा आमच्या दारात येवू नये, त्यांचे त्यांनी पाहावे, अशा शब्दांत त्यांनी समाजातील नेत्यांना फटकारले.
आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी आपली लढाई सुरूच राहील, असे स्पष्ट केले.
हेही वाचा