महामूर्ख कवीसंमेलनात आज द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना

होळी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या २६ व्या महामूर्ख कवी संमेलनात यावर्षी रंगतदार आणि जंगी डबल मिनिंग कव्वालीचा सामना रंगणार आहे.
nanded news
महामूर्ख कवीसंमेलनात आज द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामनाfile photo
Published on
Updated on

26th Mahamurkha Kavi Sammelan organized on the occasion of Holi

नांदेड, पुढारी वृत्तसेवा होळी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या २६ व्या महामूर्ख कवी संमेलनात यावर्षी रंगतदार आणि जंगी डबल मिनिंग कव्वालीचा सामना रंगणार आहे. महाराष्ट्राचे सिने गीतकार व गायक एकनाथ माळी (पार्टी पनवेल) विरुद्ध महाराष्ट्राची 'डेंजर फटाकडी' गायिका ज्योती शिंदे (पार्टी नवी मुंबई) यांच्यात रंगणाऱ्या या सामन्यामुळे आंबटशौकीनांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सोमवार दि. २ मार्च रोजी संध्याकाळी ठीक ६ वाजता मार्केट कमिटी मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे हा कार्यक्रम पार पडणार असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर, सुरेश लोट, डॉ. जुगल धूत व पंढरीनाथ बोकारे यांनी केले आहे.

nanded news
Nanded News : शहरातील मोकळ्या जागा मनपा उपयोगात आणणार का ?

उद्घाटन व मान्यवर उपस्थिती महामूर्ख कवी संमेलनाचे उद्घाटन मार्केट कमिटीचे सभापती संजय लहानकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कर्मचारी नेते बाबुराव पुंजरवाड हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून नवनिर्वाचित उपमहापौर दीपकसिंह रावत उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख अतिथी म्हणून शिवप्रसाद राठी, सतीश शर्मा, योगेश जायस्वाल, नवल पोकर्णा, सरदार रविंद्रसिंघ बुंगई, सेवकसिंघ जहागीरदार, नागेश शेट्टी, शिवाजी ईबितवार, अंबादास लालपोतू, छोटा बंडू पावडे, चिंटू हरकारे, हरिभाऊ पावडे, बंटी अग्रवाल, व्यंकट मोकले, आनंद साताळे, प्रमोद हिबारे, सुभाष देवकते, एकनाथ टेकाळे, जुगलकिशोर शुक्ला, सुमेर राजपुरोहित यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठाची शोभा वाढवणार आहेत.

nanded news
Nanded Crime News : नांदेड ग्रामीण पोलिसांची सततच्या कारवाईने वाळूमाफियांचे कंबरडे मोडले

स्त्री सहभागाचा ऐतिहासिक क्षण

दिलीप ठाकूर हे नेहमी वेगवेगळे प्रयोग राबवत असतात. होळीची परंपरा कायम राखत यावर्षी एक नवा प्रयोग करण्यात आला आहे. मागील पंचवीस वर्षांत महामूर्ख कवी संमेलनात ना प्रेक्षक म्हणून ना कवी म्हणून कोणतीही स्त्री सहभागी झाली नव्हती. मात्र यंदा द्विअर्थी कव्वाली गायनाच्या माध्यमातून ज्योती शिंदे यांनी सहभागाची हिंमत दाखवून इतिहास घडवला आहे. त्यामुळे यावर्षीच्या संमेलनात वेगळीच रंगत आणि रंजकता निर्माण होणार आहे. दरवर्षीचे कुविख्यात कवी सिद्धार्थ खिल्लारे, शाहीर रमेश गिरी, सतीश कासेवार, राजेंद्र शर्मा, बजरंग पारीख, लच्छू देशमुख, विलास जोगदंड हे कवी आपल्या शृंगारिक कविता व चावट विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.

भव्य तयारी, वेळेचे काटेकोर पालन

महामूर्ख कवी संमेलनासाठी मार्केट कमिटीच्या मैदानावर भव्य व्यासपीठ व बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री १० वाजेपर्यंतच ध्वनिक्षेपक वाजवण्याची मर्यादा असल्यामुळे कार्यक्रम नेमक्या ६ वाजता सुरू होणार आहे. कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी कामाजी सरोदे, राजेशसिंह ठाकुर, सुरेश शर्मा, अरुण काबरा, संतोष भारती, शिवा लोट, सुरेश निल्लावार हे परिश्रम घेत आहेत. संयोजन समितीतर्फे नांदेडकरांना आवाहन करण्यात आले आहे की, होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोळा वर्षावरील तरुण व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या २६ व्या महामूर्ख कवी संमेलनाचा आस्वाद घ्यावा.

बनारस आणि नांदेड अनोखी परंपरा

होळीनिमित्त मनातील कोंडलेले विचार मोकळेपणाने मांडण्याची परंपरा भारतात पुरातन काळापासून आहे. विशेष म्हणजे होळीच्या निमित्ताने महामूर्ख कवी संमेलनाची परंपरा देशात फक्त बनारस आणि नांदेड येथेच जपली जाते, ही बाब नांदेडकरांसाठी अभिमानाची आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news