नांदेड : लिंबोटी धरणाचे 12 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणातून सहाशे क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु
Limboti Dam
लिंबोटी धरण प्रकल्प 100 टक्के भरला आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

माळाकोळी : पुढारी वृत्तसेवा

लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील मनार प्रकल्प 100 टक्के भरले आहे. तसेच या धरण प्रकल्पामधून सध्या सहाशे क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे मनार नदीकाठच्या गावासह शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. अशी माहिती लिंबोटी धरणाचे शाखा अभियंता फुलारी यांनी दिली आहे.

Limboti Dam
कासारी धरण 'ओव्हर फ्लो'च्या दिशेने

सतत कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये पाणी येण्याचा ओघ सुरु आहे. या बरोबरच भारतीय हवामान विभागाने 1 सप्टेंबर पासून 6 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस असण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे धरणात पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने लिंबोटी धरणाचे शाखा अभियंता यांनी दोन दरवाजे व तीन वक्र दरवाजे उघडले असून यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात कालव्याद्वारे मनार नदीतून सोडण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या गावांसह शेतातील पिकांना फटका याचा बसण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news