नांदेड : माहूर येथील गॅस सिलेंडरच्या स्फोटात मजुराचे घर जळाले

नांदेड : माहूर येथील गॅस सिलेंडरच्या स्फोटात मजुराचे घर जळाले
Published on
Updated on

माहुर; पुढारी वृत्तसेवा : माहुर शहरात दोन घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची खळबळजनक घटना घडली. गुरुवारी (दि. १५) दुपारी ३ वाजताच्या सुमारास टेकडी परिसरातील गणपती मंदिर व बीएसएनएल कार्यालया नजीकच्या घरात हा स्फोट झाला. या स्फोटात जवळपास एक लाख रुपये किमतीच्या सर्वोपयोगी साहित्याचे नुकसान झाले असल्याचा अंदाज घरातील सदस्यांनी वर्तविला आहे.

गुरुवारी (दि. १५) दुपारी ३ वाजताच्या सुमारास शहरातील रेणुका देवी गडावर जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. गणपती मंदिरासमोरील महसूल विभागाच्या गट क्रमांक १११ मध्ये जवळपास ६ ते ७ वर्षापासून मोलमजुरी करणारे एक गरीब कुटुंब याठिकाणी राहत होते. सुनिता भगवान बाळसकर ही महिला आपल्या आशिष व गौरव या मुलांसह येथे राहत होती. एकामागून एक अशा दोन सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर या घराचे मोठे नुकसान झाले आहे.

सुनिता या गुरुवारी सकाळी घरकाम आटोपून कामावर गेल्या. तर दोन्ही मुले कॉलेजसाठी घराबाहेर गेली होती. दुपारी ३ वाजताच्या सुमारास झालेल्या स्फोटामुळे परिसरात खळबळ माजली. सुदैवाने घरात कोण नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच माहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे व कर्मचाऱ्यांच्या वाहनाने घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news