Marathwada Earthquake : "भूकंप आला, पळा-पळा"

मराठवाड्यासह विदर्भ भूकंपाने हादरला
Marathwada Earthquake
मराठवाड्यासह विदर्भ भूकंपाने हादरलेFile Photo

जवळाबाजार पुढारी वृत्तसेवा : आज (दि.१०) सकाळी मराठवाड्यासह विदर्भ भूकंपाने हादरला. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, जालनासह विदर्भातील वाशिम जिल्ह्यात सकाळी ७.१५ च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. भूकंपानंतर नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.  Marathwada Earthquake

"भूकंप आला, पळा-पळा"

आज सकाळी-सकाळी साखर झोपेत, स्वप्नांच्या दुनियात असताना ७ वाजुन १४ ते १५ मिनिटांचा दरम्यान अचानक घराचे पत्रे, खिडक्य जोरदार हलू लागले, एका क्षणी कोणाला काहीच कळेना. हादरा बसताच हादरा बसताच कामात मग्न असलेल्या लोकांनी साखर झोपेत असलेल्या मंडळीना आवाज दिला, "भूकंप आला, पळा-पळा". 

सोशल मिडियावर व्हायरल

भूकंपाचे हादरे बसताच, एकच धांदल उडाली. लोकांनी हादरा बसताच घराबाहेर पळत मोकळ्या जागेवर येवून थांबले. अचानक हादरे बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले. भूकंपाची माहिती वाऱ्यासारखी पसरली. हादरे कमी होताच घरातील फोन वाजू लागले पण काही मिनिटे घरात जावून मोबाईल घेण्याच धाडस बऱ्याचजणांच झाल नाही. काही वेळाने  सोशल मीडियावर भूकंपाच्या पोस्ट व्हायरल होवू लागल्या. ज्या भागात भूकंपाचे हादरे बसले त्या भागातील लोक आपल्या नातेवाईकांना सोशल मिडियाच्या माध्यमातून फोन, मेसेज, व्हिडिओ कॉलच्या माध्यामातून विचारपूस करु लागले. 

सीसीटीव्हीमध्ये कैद्य झालेले व्हिडिओ सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल होवू लागले आहेत.

अन किल्लारी भूकंपाच्या आठवणी जाग्या झाल्या

भूकंपानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. किल्लारी भूकंपाच्या आठवणी जाग्या झाल्या. वयोवृद्ध लोक किल्लारी भूकंपाच्या आठवणी सांगू लागले. किल्लारी भूकंप ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेला. ३० वर्षांपूर्वी 6.4 रिश्टर स्केलच्या (Killari Earthquake) या भूकंपामुळे सात हजारांवर लोकांचा बळी गेला होता. 16 हजार लोक जखमी झाले. 52 गावांतील 30 हजार घरं धरणीच्या पोटात गडप झाली होती. या भूकंपातील घरांचे पुनर्वसन झाले; परंतु मानसिक पुनर्वसन करणे अजूनही शक्य झाले नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news