

Youth Death Case
अहमदपूर (लातूर) : मागील भांडणाच्या कुरापतीवरून एका २१ वर्षीय युवकास लाकडाने मारहाण करण्यात आली.लातुर येथील सरकारी दवाखान्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध अहमदपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की हाडोळती ता.अहमदपूर येथील छाया दत्तात्रय सुर्यवंशी या रा.हनुमान गल्ली येथे राहतात.त्या शेतात मोलमजुरी करून व पती सलूनचे दुकान चालवून कुटुंबाची उपजीविका भागवतात. बळीराम दत्ता सुर्यवंशी हा त्याचा लहान मुलगा गावातच मोलमजुरीचे काम करतो. दि.२६ एप्रिल रोजी बळीराम दत्ता सुर्यवंशी यास त्याच गावातील गौस समद शेख यांच्या घरी गेला असता मागील भांडणाच्या कुरापतीवरून गफुर ऊर्फ तौहीद गौस शेख व गौस समद शेख यांनी लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले आहे.
मयताच्या नातेवाईकांनी प्रथम हडोळती येथे व त्यानंतर लातुर येथील सरकारी दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान २६ एप्रिल रोजी सायंकाळी मृत्यू झाला आहे. छाया दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध अहमदपूर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास अहमदपूर पोलीस करीत आहेत.