तरुणाचा खूनFile Photo
लातूर
Latur Crime News | लातूरमध्ये धारदार हत्याराने तरुणाचा खून
दयानंद महाविद्यालयाच्या गेट समोरील घटना
लातूर : लातूर शहरातील दयानंद महाविद्यालयाच्या गेट समोर आज (दि. १७) सकाळी साडेदहाच्या सुमारास एका तरुणाचा धारदार हत्याराने खून करण्यात आला. गेल्या दोन आठवड्यातील हा तिसरा खून असून या घटनेने लातूर शहर हादरले आहे. हा खून नेमका कशामुळे झाला व कोणी केला, याचा तपास पोलिसांनी सूरू केला आहे. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणास पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

