Latur News : औशात चिमुकलीचा मृत्यू; मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर

कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार
Latur News
Latur News : औशात चिमुकलीचा मृत्यू; मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवरfile photo
Published on: 
Updated on: 

Young girl dies in Ausa; the issue of stray dogs

औसा, पुढारी वृत्तसेवा : औसा शहरातील मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेने शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी नगर परिषद प्रशासनाकडे मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली असून, ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Latur News
Latur Crime : कोयता हल्ला प्रकरणातील आरोपीला १२ तासांत अटक

यासंदर्भात नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, या तक्रारींनंतरही प्रभावी उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच पिसाळलेल्या कुत्र्यांचा धोका वाढल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्ना गंभीर बनला आहे. तीन वर्षीया चिमुकलीच्या मृत्यूच्या घटनेनंतर तरी नगर परिषद प्रशासनाने जागे होऊन ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

Latur News
Anandacha Shidha Diwali Scheme : गरिबांचा 'आनंदाचा शिधा' दसरा, दिवाळीत कुठे हरवला?

मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या समस्येवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी आणि नागरिकांना भयमुक्त वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी इनामदार यांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास एमआयएमच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवदनाव्दारे दिला आहे.

logo
Pudhari News
pudhari.news