Latur Crime : कोयता हल्ला प्रकरणातील आरोपीला १२ तासांत अटक

औसा पोलिसांची कारवाई; आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

औसा : औसा शहरातील जुन्या बसस्थानकासमोरील हॉटेलजवळ तेजस गायकवाड याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या अक्षय ऊर्फ आकाश नरवडे याला औसा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली. न्यायालयाने आरोपीला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी (दि. २१) ही घटना घडली.

भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ल्यात तेजस गायकवाड गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. त्याला तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांतून होत होती.पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी शहरात झालेल्या चोरीच्या घटनेत पवन जाधव याच्यावर आरोप होता.

Crime News
Gyanesh Kumar EC Controversy: ज्ञानेश कुमारांवर पुन्हा लेटर बॉम्ब? RTI मधून अंतर्गत वादाबाबत मोठी माहिती आली समोर

तेजस गायकवाड हा पवनला मदत करीत असल्याच्या कारणावरून संतापलेल्या अक्षय ऊर्फ आकाश नरवडे याने तेजसवर कोयत्याने हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी औसा पोलिसांनी दोन पथके तयार केली. आरोपी याकतपूर परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले; मात्र तो तेथूनही पसार झाला.

पोलिसांनी सारोळा, सेलू, कवा मार्गे पेठपर्यंत त्याचा पाठलाग केला. पेठ येथे तैनात असलेल्या दुसऱ्या पथकाने आरोपीला अडवून ताब्यात घेतले.या प्रकरणी आरोपीविरुद्ध जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केल्यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Jalna Water Scarcity | पाणीटंचाई : जिल्हा परिषद ॲक्शन मोडवर

पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी करीत आहेत.ही कारवाई पोलीस निरीक्षक रेवणनाथ डमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हवालदार फुलारी, सरवदे, घुले, पोलीस कॉन्स्टेबल महेश क्षीरसागर, योगेश भंडे व अन्य पोलीस अंमलदारांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news