

Woman attempts to drown herself after crops go under water
निलंगा, पुढारी वृत्तसेवा: अरे सरकार माझे कसे होईल माझे जनावरे, कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या शेतातली मातीसह पिकं गेले असा टाहो गुंजरगा येथील महिलेने करत नदीच्या पात्रात जीव देण्याचा प्रयत्न केला. गावातील काही युवकांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना वाचवले.
गुंजरगा गावा शेजारून तेरणा नदी जाते, गेल्या चार-पाच दिवसांपासून नदीला पूर आला आहे. परिसरातील शेती व गावात पाणी शिरल्याने पिकाचे व घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात कांता जीवन शिंदे यांच्या शेतातील शेळ्या, म्हशी, कोंबड्या या पाण्यात वाहून गेल्या तसेच शेताचे पूर्णतः नुकसान झाले त्यामुळे आतापुढे जगायचे कसे? खायचे काय ? आम्हाला कोण सांभाळणार ? असा टाहो फोडत फोडत कांता शिंदे यांनी थेट नदीच्या पात्राकडे धाव घेतली.
यावेळी गावातील रमेश धुमाळ, दिनेश धुमाळ, मारुती धुमाळ, राजीव धुमाळ यांनी त्यांची समजूत काढून आपण सरकारकडे नुकसानीची मागणी करू तुम्हाला पैसे मिळवून देऊ असा शब्द दिला व त्यांना नदीच्या पात्रातून माघारी आणले.