Latur News : रेणुकादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

रेणापूर : रविवारी गर्दीचा उच्चांक; चोख पोलिस बंदोबस्त, भाविकांना महाप्रसादाचे वाटप
Latur News
Latur News : रेणुकादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दीfile photo
Published on: 
Updated on: 

Huge crowd of devotees for the darshan of Renuka Devi

रेणापूर, पुढारी वृत्तसेवा: आराध्यदैवत श्री रेणुका देवी मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची अलोट गर्दी होत आहे रविवारी (दि.१८) आठव्या माळेच्या दिवशी हजारो महिला पुरुषांनी रांगेत उभे राहून देवीची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले श्री रेणुका देवीचे दर्शन घेतल्यानंतर भावीक तुकाई देवीच्या दर्शनासाठी जात आहेत तेथेही मोठी गर्दी होत आहे. वृद्ध, अपंग व्यक्तींना दर्शन घेता यावे यासाठी ट्रस्ट मंडळाने विशेष दर्शन पासची व्यवस्था केली आहे.

Latur News
Latur Crime : जुगार अड्ड्यावर धाड; ३.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

शनिवार व रविवारी कार्यालयाला सुट्टी असल्यामुळे लातूर व इतर ठिकाणचे भाविक पहाटे तीन चार वाजल्यापासुनच देवीच्या दर्शनासाठी पायी चालत येत आहेत दिवसभर मंदीर परिसरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. रात्री दहा वाजेपर्यंत देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी दिसत होती. विशेष करून महिला भाविकांची मोठी गर्दी वाढत आहे. ११ ऑक्टोबरला घटस्थापना झाली. त्यानंतर दररोज पहाटे चार वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत अनेक भाविक भक्त देवीची महापुजा आरती करीत आहेत तसेच दररोज दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जात आहे.

लातूर येथुन दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी चालत येत आहेत त्यांना रस्त्यात पिण्याचे पाणी व प्रसाद देण्याची अनेकांनी व्यवस्था केली आहे. पाणपोईच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. रविवारी आठवी माळ असुन मंगळवारी विजयादशमीच्या दिवशी देवीच्या पालखी मिरवणुक सोहळ्याने नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे. दररोज देवीच्या दर्शनासाठी गर्दी वाढत आहे.

सर्वांना वेळेवर दर्शन घेता यावे यासाठी ट्रस्ट मंडळाचे कार्याध्यक्ष राम पाटील, पदाधिकारी गुरसिद्धप्पा उटगे, तुकाराम कोल्हे, अॅड. प्रशांत आकनगीर, रमाकांत वाघमारे, शहाजी कातळे, पंडीत माने, पुंडलीक इगे दिलीप आकनगीर, मनोहर व्यवहारे हे मंदिरातच ठाण मांडून बसले आहेत त्यांच्या व्यवस्थापनामुळे तसेच पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामुळे भाविकांना सुरक्षित व सुरळीत दर्शन घेणे सोपे होत आहे. ट्रस्ट मंडळ येथील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. श्री रेणुका देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरा समोर उभा असलेली ५० फुट उंचीची" हलती दिपमाळ" हलवून पाहण्यासाठी भावीकांची गर्दी होतांना दिसत आहे.

Latur News
Latur Ganja Seized | उसाच्या फडात धाड; ८ किलो ६२० ग्रॅम गांजासह सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त

बाहेरून आलेल्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून महाप्रसादही वाटप केला जात आहे. मंदिरात स्वच्छता राहवी म्हणून मंदीर व्यवस्थापनाने विशेष काळजी घेतली आहे. मंदिर परिसरात अनेक सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्याच्या माध्यमातून भुरट्या चोरांवर लक्ष ठेवले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news