Udgir PS Election | उदगीर पं.स सभापतीपदी वनमाला मरलापल्ले, उपसभापतीपदी बापूसाहेब भोसले बिनविरोध

Latur Local Body | उदगीर पंचायत समितीवर महायुतीची सत्ता
Vanmala Marlapalle Chairperson
Vanmala Marlapalle Chairperson Pudhari
Published on
Updated on

Vanmala Marlapalle Chairperson Bapusaheb Bhosle Deputy Chairperson

उदगीर : उदगीर पंचायत समितीच्या सभापतीपदी गुडसूर गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वनमाला तात्यारेड्डी मरलापल्ले यांची, तर उपसभापतीपदी हांडरगुळी गणातून निवडून आलेले भाजपचे बापूसाहेब उद्धवराव भोसले पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे उदगीर पंचायत समितीवर महायुतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे.

सभापती व उपसभापती निवडीसाठी झालेल्या प्रक्रियेत पिठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी काम पाहिले. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वनमाला मरलापल्ले यांचा, तर उपसभापतीपदासाठी भाजपकडून बापूसाहेब भोसले पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अन्य कोणताही अर्ज न आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

Vanmala Marlapalle Chairperson
Latur News : रंगोत्सवात लहान-थोर न्हाले; जिल्ह्यात रंगपंचमी उत्साहात

या निवडीमुळे उदगीर पंचायत समितीवर महायुतीची सत्ता स्थापन झाली असून तालुक्यातील विविध सत्ताकेंद्रे महायुतीच्या ताब्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाचा प्रभाव कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

सभापती व उपसभापती निवडीच्या वेळी पंचायत समिती सभागृहात सर्व पक्षांचे सदस्य उपस्थित होते. यामध्ये नागेंद्र बिरादार, कोमल कमलाकर फुले, सुरेखा सर्जेराव पाटील, सरमंगला मनोहर बिरादार, धनराज धर्मपाल नादरगे, शिल्पा शक्ती, सुनिता प्रकाश राठोड, विमल भिवाजी चिखले, भास्कर मधुकर जाधव, बालाजी केरबा अंधारे, काशीबाई बळीराम सोनकांबळे, चंद्रकांत गोविंद कांबळे, प्रकाश नागेंद्र बिरादार आदी सदस्य उपस्थित होते.

Vanmala Marlapalle Chairperson
Latur Ausa accident news | औसा येथे कारचा भीषण अपघात; कारमधील चौघे जागीच ठार, दोन गंभीर जखमी

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद गटनेते दिलीपकुमार मटके, निडेबन गटाचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. दीपक सोमवंशी, तोगरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर बिरादार, युवा नेते मयूर बनसोडे, भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मपाल नादरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बालाजी भोसले, वसंत पाटील, श्याम डावळे, शहराध्यक्ष सय्यद जानीमिया, अनिल मुदाळे, कमलाकर फुले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news