

जावेद शेख
उदगीर : उदगीर शहरातील दुभाजकात माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणला यामधून शहराचा सर्व भागात सोयी सुविधा उपलब्ध करून झाडे लावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला असताना उदगीर नगरपालिकेकडून जणू झाडे मारण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुख्य रस्त्यावर असणाऱ्या दुभाजकात असणारी झाडे पाण्या वाचून सुकून जात असताना पालिकेला या झाडांना पाणी देण्याचे ही भान नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे,
उदगीर शहर सुंदर आणि हिरवेगार दिसावे यासाठी प्रथम येथील उदगीर शहरातील काही निसर्गप्रेमी युवकांनी व शहरातील व्यापारी ज्येष्ठ नागरिकांनी ग्रीन उदगीर या नावाने डॉक्टर झाकीर हुसेन चौक देगलूर रोड दुभाजकाच्या मध्यभागी झाडे लावली होती ही झाडे जगवण्यासाठी व वाढवण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी असमर्थता दाखवली होती, मात्र सध्याचे मुख्य अधिकारी उदगीर शहरातील हिरवळ सुकत असताना उदगीर नगरपालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे ही हिरवळ पाणी व देखभालीअभावी अक्षर होरपळून जात आहे ,अनेक ठिकाणी या झाडांची पान गळत होऊन नुसती वाळलेली लाकडी शिल्लक राहिलेली आहेत,
उदगीर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण आकृती पुतळा उद्घाटन प्रसंगी शहरातील तू भाजकाचा मध्यभागी महागड्या किमतीचे झाडे लावून एका झाडाची किमान 14ते 15 हजार रुपये असून एवढे महागडी झाडे पाण्याविना वाळत आहेत या झाडांच्या मुळ्या पूर्ण सुकून गेल्याने पालिकेने जरी आता पाणी घातले तरी यातील 50 % झाडे मिली आहेत ती पुन्हा फुटणार नाहीत.
शहराला हायटेक टच देण्यासाठी लोकप्रतिनिधी झटत असताना पालिकेचा गलथान कारभार याला गालबोट लावत असल्याने आमदार संजय बनसोडे पालिकेला याचा जाब विचारणार का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत, दुभाजकातील वाळत असलेली झाडे संदर्भात मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
अनेक ठिकाणी काटेरी झुडपे
मुख्य रस्त्याच्या या दुभाजकात शुभेच्छा झाडामध्ये अनेक ठिकाणी काटेरी झुडपे उगवली आहेत तर सगळीकडे झाडाच्या बुडाला गवत येऊन ते झाडाचे अन्न पाणी घेत आहेत हे वेळीच काढून टाकणे गरजेचे असताना केवळ साफसफाईच्या नावाखाली यावर खर्च केला जात आहे अजून काही दिवस जर या झाडाला पाणी नाही मिळाले तर संपूर्ण झाडांचा कोळसा झाल्याशिवाय राहणार नाही,