Wedding hall traffic problem : उदगीरात मंगल कार्यालयाची मनमानी, पार्किंगबाबत बेफिकिरी

रस्तेच झाले वाहनतळ; पालिका प्रशासनही थंड, नागरिक त्रस्त
wedding hall traffic problem
उदगीरात मंगल कार्यालयाची मनमानी, पार्किंगबाबत बेफिकिरीpudhari photo
Published on
Updated on

जावेद शेख

उदगीर : शहरात 25 हुन अधिक मंगल कार्यालय असून त्यापैकी निम्म्याहून अधिक मंगल कार्यालयांना वाहनतळ नसल्याने तेथे येणारे वऱ्हाडी आपली वऱ्हाडी रस्त्याकडेला मनमानेल तशी लावत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून या मार्गावरून आपली वाहने मार्गस्थ करण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र या प्रश्नाशी आपले काहीएक देणेघेणे नाही अशा अविर्भावात नगरपालिका प्रशासन व मंगल कार्यालयाचे मालक वागत असल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत तालला आहे.

उदगीर शहरात दिवसेंदिवस वाहतुकीच्या समस्येत भर पडत आहे मोठे असलेले उदगीर शहरातील समता नगर रेल्वे गेट, डॅम रोड, नांदेड रोड ,जळकोट रोड मार्गावरही वाहतूक कोडींचा सामना उदगीरकरांना करावा लागत आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे अशा परिस्थितीत रस्त्यांची रुंदी आणि पार्किंगची जागा मात्र आहेतशीच आहे प्रंसगी आणखी कमी होत आहे. प्रत्येक मंगल कार्यालयाने येणाऱ्या वार्डाच्या वाहनासाठी आपली स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी हे बंधनकारक असतानाही अनेक मंगल कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

wedding hall traffic problem
'साहब' पायी अन् सामान्यांना भुर्दंड; ठेकेदाराच्या मनमानीचा जिल्हाधिकारी कार्यालयात 'राडा'

वाहने सर्रास रस्त्यावरच पार केलेली आढळून येतात काही मंगल कार्यालयाने मोकळ्या जागेत लॉन्स निर्माण केले मात्र पार्किंग जागा ठेवण्याकडे दुर्लक्ष केल्याची ही दिसून येत आहे यावर कारवाई करण्याची अपेक्षा असताना मात्र नगरपालिका प्रशासन डोळेझाक करताना दिसत आहे, उदगीर शहरातील मंगल कार्यालयासमोर रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या गाड्यांवर पोलिस पथक कारवाई करताना दिसत नाही.

मंगल कार्यालयात लग्न समारंभ असल्या दिवशी आम्ही जास्तीचे सुरक्षारक्षक लावून शिस्तीत पार्किंग करत असल्याचा दावा मंगल कार्यालये करतात मात्र तरीही रस्त्यावरची वाहतूकीचा खोळंबा ठरलेला असतो दरम्यान याबाबत नगर पालिका प्रशासन व नगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग कसल्याच प्रकारची कारवाई करत असल्याचे दिसून येत नाही. उदगीर शहरातील समता नगर रेल्वे गेट जवळील मंगल कार्यालया समोरील वाहनाची गर्दी पाहून तर समता नगर भागातील ज्या दिवशी लग्नकार्य आहे त्या दिवशी तेथील इमर्जन्सी अंबुलन्स जाण्यासाठी सुद्धा रस्ता भेटत नाही .

wedding hall traffic problem
Dharashiv SSC result 2026 : दहावीच्या परीक्षेत मुलींची दमदार कामगिरी

लग्न कार्यासाठी येणाऱ्या व्हीआयपी, लोकप्रतिनिधी ही आपल्या गाड्या उभे करतात. रस्त्यावर असलेल्या मंगल कार्यालयासमोर त्यांच्या व कार्यकर्त्यांच्या वाहनाचा ताफा थांबवला जातो आपल्या वाहनांमुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होतो याचे त्यांना काहीही वाटत नाही.या मंगल कार्यालयासमोरील बेसिस्त वाहनाच्या पार्किंग व्यवस्थे संदर्भात उदगीर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सोमनाथ जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन आऊट ऑफ कव्हरेज च्या बाहेर होता.

  • मंगल कार्यालयासमोरील बेशिस्त वाहतुकीसंदर्भात व मंगल कार्यालयासमोरील पार्किंग व्यवस्थे संदर्भात उदगीर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिलीप गाडे विचारले असता, उदगीर शहरातील मंगल कार्यालयाना आम्ही आमच्या स्तरावरून बेशिस्त वाहतूक व पार्किंग व्यवस्थे संदर्भात नोटीस दिलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news