Latur News : उदगीर तालुक्यातील ८७ ग्रा.पं.च्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

कहीं खुशी, कहीं गम; २०२५-२०३० साठी आरक्षण निश्चित
Gram Panchayat Reservation
Gram Panchayat Reservationpudhari photo
Published on: 
Updated on: 

उदगीर : उदगीर तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी सन २०२५-२०३० या कालावधीचे आरक्षण सोमवारी (२३ नोव्हेंबर) जाहीर करण्यात आले. अनुसूचित जाती २२, अनुसूचित जमाती २, नागरिकांचा मागास प्रवर्ग १९ आणि खुला प्रवर्ग ४४ अशा जागांचे आरक्षण निश्चित झाले. आरक्षण जाहीर होताच गावागावांत राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुकांमध्ये कहीं खुशी, कहीं गमचे चित्र आहे.

कै. मलशेट्टीआप्पा पाटील नागराळकर पंचायत समिती सभागृहात तहसीलदार राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वाजता सोडत पार पडली. शासनाच्या सुधारित अधिसूचनेनुसार आरक्षणाची संख्या निश्चित करून पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात आली.

Gram Panchayat Reservation
Beed Leopard Attack : बिबट्यांचा मानवी वस्त्यांकडे मोर्चा; घागरवाड्यात गायीचा बळी!

अनुसूचित जातीच्या २२ जागांमध्ये ११ महिला व ११ सर्वसाधारण, अनुसूचित जमातीच्या दोन जागांमध्ये एक महिला व एक सर्वसाधारण, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या १९ जागांमध्ये ९ महिला व १० सर्वसाधारण, तर खुल्या प्रवर्गाच्या ४४ जागांमध्ये २२ महिला व २२ सर्वसाधारण आरक्षण निश्चित झाले.

अनुसूचित जाती महिला आरक्षण धडकनाळ, कल्लूर, चांदेगाव, शेलाळ, मादलापूर, करखेली, हिप्परगा (डावूळ), चांडी, निडेबन, बामणी व तादलापूर येथे, तर सर्वसाधारण आरक्षण सताळा (बु.), तुडुंचर, इटमालपूर, अरसनाळ (महानगांव), सुकणी, जकनाळ, शेकापूर, कौळखेड, जानापूर, कनीयळादेवी व देवजण येथे पडले.

Gram Panchayat Reservation
Beed Road Accident : रेसच्या नादात आमच्या आई-वडिलांचा बळी

अनुसूचित जमाती महिला उमरगा मन्ना, तर सर्वसाधारण खेरडा खु. येथे आरक्षण पडले. नामाप्र महिला आवलकुडा, कुमठा खु., आडोळवाडी, देऊळवाडी (मुर्तलगाव), तुडार, कुमदाळ, एकुरकारोड, मांजरी व बनशेळकी येथे, तर सर्वसाधारण करवंदी, होनहिप्परगा, डुगरशेळकी, रावणगांव, धुडीहिप्परगा, वायगांव, लोणी, चिमाचीवाडी, चिघळी व टाकळी (वागदरी) येथे पडले.खुल्या महिला हाकनकवाडी, दावणगाव, कुमदाळ (उ), हाळी, बेलसकरगा, कोदळी, मलकापूर, गुरधाळ (उ), लंबगाव, मोतळवाडी, शंभुउमरगा, नागलगांव, वाडी, कासराळ, गुडसुर, हंडरगुळी, सुमठाणा, वाढवणा (बु.), शिराळ (जा), पिंपरी, डाऊळ व वाढवणा (खु.) येथे, तर खुल्या सर्वसाधारण करडखेल, शेफळ, गंगापूर, डांगेवाडी, डडस, तोगरी, नळगीर, माळेवाडी, मोघा, येणकी, वागदरी, लोहारा, सोमनाथपूर, हैबतपूर, हेर, बोरगाव (बु.), नेगाव, भाकसखेडा, मल्लापूर, हंगरगा, तिवटयाळ व नावंदी येथे आरक्षण पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.