Beed Road Accident : रेसच्या नादात आमच्या आई-वडिलांचा बळी

राजकीय दबावाचा आरोप करत तिन्ही मुलांची न्यायासाठी मागणी
Beed Road Accident
Beed Road Accidentpudhari photo
Published on: 
Updated on: 

बीड: माजलगाव येथील भीषण अपघातात आई-वडिलांना गमावलेल्या गायकवाड कुटुंबीयांनी आता न्यायासाठी आक्रोश केला आहे. ‘रेसिंगच्या नादात आमचे आई-वडील गेले, आमच्या डोक्यावरचं छत्र हरपलं. आता आमचे आई-वडील आम्हाला परत आणून देणार आहेत का?’ असा हृदय पिळवटून टाकणारा सवाल मृत प्रल्हादराव गायकवाड आणि सुनीता गायकवाड यांच्या तिन्ही मुलांनी उपस्थित केला आहे. या अपघातातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे मित्रांसोबत रेस लावल्याच्या आरोपादरम्यान दुचाकीला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत माजलगावजवळील मंगरूळ-३ येथील प्रल्हादराव गायकवाड आणि त्यांच्या पत्नी सुनीता गायकवाड यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा गंभीर आरोप गायकवाड कुटुंबीयांनी केला आहे.

Beed Road Accident
Beed Accident Case : माझा मुलगा गाडी चालवत नव्हता, अनुराग नाईकनवरे चालवत होता

संबंधित तरुणांनी दारू प्यायली होती, मात्र त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. त्यांच्या वाहनात हत्यारे होती, असा दावाही कुटुंबीयांनी केला आहे. अद्याप आरोपींना अटक झालेली नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपी अल्पवयीन असतील तर त्यांच्या पालकांवरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मृत दाम्पत्याची मुलगी अश्विनी गायकवाड हिने भावनिक प्रतिक्रिया देताना, 'तीन दिवस झाले, मी माझ्या आई-वडिलांना शोधत आहे. ते कुठेही दिसत नाहीत. माझे आई-वडील आता कोण मला परत आणून देणार?' असा आर्त सवाल केला.तर मुलगा रोहित गायकवाड आणि आदित्य गायकवाड यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही घटना रेसिंगच्या नादात घडल्याचे आम्ही वारंवार सांगत होतो; मात्र पोलिसांनी या महत्त्वाच्या बाबीची नोंद घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला.

Beed Road Accident
Jalna Municipal Corporation : पाणीटंचाई, बीओटी प्रकल्पावर महापौर, उपमहापौरांचा प्रशासनाला जाब !

आरोपींच्या कुटुंबीयांमध्ये वाळू माफिया आणि नगरसेवक असल्याने प्रकरणावर दबाव आणला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.आम्हाला केवळ न्याय मिळावा एवढीच अपेक्षा नाही, तर भविष्यात अशा प्रकारामुळे दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळू नये. सरकारने अशा बेजबाबदार रेसिंगला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी गायकवाड कुटुंबीयांनी केली आहे.

आता कुठे चांगले दिवस आले होते

माझ्या वडिलांनी व आईने आयुष्यभर खूप संघर्ष केला. मला शिकवले, माझ्या बहीण- भावाला शिकवले. आता मी इंजिनीयर म्हणून कंपनीत कार्यरत झालो होतो. मला माझ्या आई-वडिलांना सुखात ठेवायचे होते. पण या भीषण अपघातामुळे आमचे स्वप्न उद्ध्व‌स्त झाले आहे. अशी वेळ इतर कोणावर येऊ नये, या प्रकरणात सखोल तपास व्हावा एवढीच माझी अपेक्षा असल्याचे आदित्य गायकवाड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.