Udgir foreign funding scam : उदगीरमध्ये २१४३ कोटींचा परदेशी निधी घोटाळा

उदगीर शहर ठाण्यात १७ जणांविरुद्ध गुन्हा
scam
ScamPudhari
Published on
Updated on

उदगीर : परदेशी निधी पाठवण्याच्या व्यवहारात खोटी प्रमाणपत्रे सादर करून तब्बल २१४३ कोटी ७९ लाख ४३ हजार ७६० रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उदगीरमध्ये समोर आला आहे. आयकर विभागाच्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलिस ठाण्यात १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

उप आयकर संचालक दीपक कुमार, युनिट-१, औरंगाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. त्यानुसार श्याम शिवप्रसाद कलानी, रा. न्यू मोंढा रोड, उदगीर आणि इतर १६ कंपन्यांनी संगनमत केल्याचा आरोप आहे. २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीत परदेशी निधी पाठवण्याच्या व्यवहारासंदर्भात खोटी प्रमाणपत्रे तयार करून त्यांच्या आधारे २१४३ कोटी ७९ लाख ४३ हजार ७६० रुपयांपेक्षा अधिक निधी परदेशात पाठवण्यास सहाय्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

scam
sugar price hike in Beed : साखरेच्या दरात किलोमागे १५ रुपयांची वाढ; उसाच्या भावाचे काय?

हा कथित व्यवहार १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत न्यू मोंढा रोड, उदगीर येथून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा. २१ ऑगस्ट रोजी रात्री १०.५८ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक भगीरथी पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. एवढ्या मोठ्या रकमेच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा तपास पुढे कोणते धागेदोरे उघड करतो, याकडे लक्ष लागले आहे.

scam
Bhokardan pomegranate farming : माळरानावर फुलवली डाळिंब शेती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news