सात वर्षीय बालकाच्या खून प्रकरणी 'त्‍या' दोघांना न्यायालयीन कोठडी

शहरातील सात वर्षीय बालकाच्या खून प्रकरणात आज शुक्रवारी दोन्हीही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.
Latur Crime News
सात वर्षीय बालकाच्या खून प्रकरणी 'त्‍या' दोघांना न्यायालयीन कोठडी File Photo
Published on
Updated on

Two accused remanded in judicial custody for murder of seven-year-old boy

चाकूर, पुढारी वृत्तसेवा

शहरातील सात वर्षीय बालकाच्या खून प्रकरणात आज शुक्रवारी दोन्हीही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.

Latur Crime News
Chakur Crime News : 'त्या' बालकाच्या खून प्रकरणी आणखीन एक जण गळाला, पहाटे केली अटक

चाकुरात देवांश मंगेश स्वामी या सात वर्षीय बालकाचा चुलती अनिता स्वामी हिने खून केला आहे. पोलीस तपासाअंती येथील संजय स्वामी याने त्या खूनात मदत केली असल्याचे निष्पन्न झाल्यावरून त्यालाही पोलिसांनी अटक केली होती.

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत होते. हा खून एकट्या अनिताने केला नसावा तिला कोणीतरी मदत केली असावी असा अंदाज पोलिसाचा होता. त्यानुसार तपासाची चक्रे अधिक गतिमान करत यातील दुसरा आरोपी शोधण्यात यश मिळवले.

Latur Crime News
Beed Crime | केज, माजलगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; नराधमांना अटक

संजय काशिनाथ स्वामी (वय ३४ वर्षे) यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता संजयने अनिताला मदत करत खून केला हे सिद्ध झाले आहे. या प्रकरणात अनिता स्वामी आणि संजय स्वामी यांना न्यायाल्याने २४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. कोठडी संपताच आज पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता अनिता व संजय या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news