Beed Crime | केज, माजलगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; नराधमांना अटक

कळंब बसस्थानकावरून आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पॉक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Minor girl kidnapping Beed district
Minor girl kidnapping Beed districtPudhari
Published on
Updated on

Minor girl kidnapping Beed district

केज : शिवजयंती निमित्त शाळेतील कार्यक्रमासाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर निर्जनस्थळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यात घडली आहे. या प्रकरणातील आरोपी समीर ताजोद्दीन शेख याला युसूफवडगाव पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे कळंब येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना काय?

दिनांक २१ फेब्रुवारी रोजी केज तालुक्यातील एका गावातील १० वीत शिकणारी मुलगी शिवजयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेसाठी शाळेत जात होती. यावेळी समीर शेख याने तिचे अपहरण केले. साळेगाव ते शेलगाव गांजी दरम्यान एका निर्जन शेतात नेऊन त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने पीडितेला केज बसस्थानकावर सोडून दिले. घाबरलेली पीडित मुलगी बसने कळंबला गेली आणि तिथून पुन्हा घरी परतली. घरी आल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Minor girl kidnapping Beed district
Beed Crime News : तरूणास जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद

आरोपीला रिक्षातून घेतले ताब्यात

गुन्हा दाखल होताच युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरमे यांनी तपासचक्र फिरवले. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक आणि सीडीआर (CDR) तपासून तांत्रिक माहिती मिळवली. पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याचे समजताच आरोपी समीर शेख हा पळून जाण्यासाठी कळंब येथील बसस्थानक परिसरात एका रिक्षात लपून बसला होता. मात्र, पोलिसांनी त्याला शोधून काढून त्याच्या मुसक्या आवळल्या.

पोलीस कारवाई आणि कोठडी

या प्रकरणी समीर ताजोद्दीन शेख याच्याविरुद्ध युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४८/२०२६ नुसार बलात्कार, पॉक्सो (POCSO) आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला २६ फेब्रुवारीपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे करत आहेत.

Minor girl kidnapping Beed district
Beed crime news | कोयत्याचा धाक दाखवून 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

माजलगाव: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी

माजलगाव : शहरातून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माजलगाव शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीवर 'पोक्सो' (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार संतोष दहिभाते (वय २३ वर्षे) हा पीडित मुलीच्या घरी बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. त्याने २ फेब्रुवारी रोजी या अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आळंदी येथून आरोपीला अटक पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास लावत मुलीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान, आरोपी आणि पीडित मुलगी २१ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने तिथे पोहोचून दोघांनाही ताब्यात घेतले.

Minor girl kidnapping Beed district
Beed Crime News | धारूर येथील एकावर प्राणघातक हल्ला; कोयत्याने सपासप वार

गुन्ह्यात कलमांची वाढ मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता, आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी गुन्ह्यात कलमांची वाढ करत 'पोक्सो' आणि अत्याचाराचे कलम समाविष्ट केले. २३ फेब्रुवारी रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २६ फेब्रुवारीपर्यंत (३ दिवस) पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एन. राठोड करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news