

Marathwada Tribal Agitation
निलंगा : मराठवाडा आदिवासी महादेव कोळी मल्हार होळी समाज संघटनेच्या वतीने निलंगा येथील कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून चार समाज बांधव अन्नत्याग उपोषण करत आहेत त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. याचा असंतोष या आंदोलनात झाला आहे. मात्र प्रशासन व लोक प्रतिनिधी याची दखल घेत नसल्याने रविवारी सकाळ पासूनच निलंगा उपजिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर मुख्य रस्त्यावर हजारो महादेव कोळी समाज बांधवातील महिला व पुरुषांनी सरकार व प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत ठिय्या मांडला आहे.
जातीचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही असा पवित्रा घेण्यात आला आहे.