

Three more people in police custody in Latur drug case
लातूर, पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीरपणे एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या लातूर येथील एकासह मुंबईच्या अन्य एकाच्या मुसक्या लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ११ जुलै रोजी आवळून त्यांच्या ताब्यातून ७९ ग्रॅम ड्रग्ज व एक गावठी पिस्तूल हस्तगत केले होते.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास करणाऱ्या पोलिसांच्या संयुक्त पथकाने लातूरमधून आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. अटकेतील लातूर येथील गणेश शेंडगे या आरोपीकडून ड्रग्ज विकत घेतल्याचा व गणेश शेंडगे याने त्याच्या जवळच्या अनेक मित्रांना ड्रग्ज विकल्याचा खुलासा तिन्ही आरोपींनी केला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ११ जुलै रोजि शहरातील एलआयसी कॉलनी येथील गणेश अर्जुन शेंडगे व मुंबईतील रणजित तुकाराम जाधव यांना ७९ ग्रॅम एमडी ड्रग्ज व एका गावठी पिस्तूलासह ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटकेतील आरोपींची सखोल चौकशी केली असता अजय धनराज सूर्यवंशी (वय २१, रा. शिवपार्वतीनगर, कन्हेरी शिवार, लातूर), अजर सय्यद (वय २८, रा. रत्नापूर चौक, लातूर) व अर्जुन ऊर्फ गोट्या अच्युतराव कुपकर (वय ३०, रा. आर्वी, ता. लातूर) यांना एमडी ड्रग्ज विकल्याचे आरोपींनी सांगितले.
या माहितीआधारे १२ जुलै रोजी तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या तिघांची चौकशी केली असता तिघेही अटकेतील गणेश शेंडगे याचे जवळचे मित्र आहेत. य तिघांनी शेंडगे याच्याकडून सेवन करण्यासाठी ड्रग्ज विकत घेतले असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्य मित्रांनाही सेवन जवळच्या करण्यासाठी शेंडगे याच्याकडून ड्रग्ज उपलब्ध करुन देत असल्याचे सांगितले. एकंदर वरील तिनही आर- ोपी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन क नशेबाज असल्याचे चौकशीत समोन आले आहे.
लातूर ड्रग्ज प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक करीत असून, सदरचे अमली पदार्थ लातूरमध्ये नेमके आले कोठून व कोणी दिले? याबाबतची गोपनीय माहिती हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे दोन पथक रवाना झाले आहेत.