Latur Crime News : खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी ताब्यात; कारसह हत्यारे जप्त

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींच्या शोधासाठी सुरू असलेल्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना पळशी फाटा येथे ताब्यात घेतले.
Latur Crime News
Latur Crime News : खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी ताब्यात; फॉरच्यूनरसह हत्यारे जप्तfile photo
Published on
Updated on

Three accused in murder case taken into custody; weapons and Fortuner vehicle seized

लातूर पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींच्या शोधासाठी सुरू असलेल्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना पळशी फाटा येथे ताब्यात घेतले. अल्ताफखान सरदारखान पठाण (४१, रा. मिलिंद नगर, परळी वैजनाथ), उमर मेहबुब शेख (२४, रा. आझाद नगर, परळी वैजनाथ) आणि खालेद हमीद शेख (३९, रा. मिलिंद नगर, हामु. बरकत नगर, परळी वैजनाथ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली दोन धारदार हत्यारे आणि टोयटो फॉरच्यूनर वाहन असा सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Latur Crime News
Latur Rain News : पिके वाळू लागली; रेणा धरणात २१ टक्केच जलसाठा

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या शोधात होते. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तपास करीत होते.

दरम्यान, गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे तीन संशयित पळशी फाटा येथे फॉरच्यूनर वाहनासह थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पंचांसह पथकाने तेथे धडक कारवाई केली. पांढऱ्या रंगाच्या टोयटो फॉरच्यूनर (एमएच ४४ टी ०२२१) मध्ये तिघे आढळून आले. त्यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

Latur Crime News
Latur Crime | लातूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात १६ लाखांची चोरी!

वाहनाची झडती घेतली असता एक कोयत्यासदृश धारदार हत्यार आणि एक फोल्डिंग चाकू आढळून आला. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही हत्यारे तसेच फॉरच्यूनर वाहन जप्त केले. तिन्ही आरोपींना पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने, पोलिस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलिस अंमलदार माधव बिल्लापटे, तुराब पठाण, गोविंद येलमटे, पाराजी पुठेवाड आणि तुळशीराम बरुरे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news