

The excise department takes action against illegal liquor sales
लातूर, पुढारी वृत्तसेवा : नववर्षाच्या पूर्वसंध्येला चाकूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात विविध भागांमध्ये अवैध ढाब्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत पर राज्यातील मध्यविक्री प्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून पाऊणल ाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे सहआयुक्त सुर्वे, नांदेड विभागाचे उप-आयुक् बी. एच. तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्हयाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री नविन वर्षाच्या पुर्वसंध्येला लातूर जिल्हयात अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक विरोधात चाकूर विभाग यांनी एक गंभीर स्वरुपाचा गुन्हा नोंद करण्यात आले.
यात २ आरोपीना अटक करण्यात आली. सदर गुन्हयामध्ये परराज्यातील म्हणजेच गोवा राज्यातील १८० मिलीच्या विदेशी मद्य इंम्पेरियल ब्ल्यु च्या १४४ बाटल्या, मॅकडॉल नं. १ च्या १४४ बाटल्या तसेच रॉयल स्टॅगच्या ९६ बाटल्या अशा एकूण ३८४ बाटल्या जप्त करुन एकूण रु. ८७३६०/-रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
पुढील तपास दुय्यम निरीक्षक शिवराज वाघमारे करीत आहेत. सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, केशव राऊत, उप अधीक्षक एम. जी. मुपडे, निरीक्षक यु. वि. मिसाळ, दुय्यम निरीक्षक एस. के. वाघमारे, एस. आर. राठोड, आर. एम. माकोडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान ए. ए. देशपांडे, आर. एस. चिचोलीकर, बी. ए. गायकवाड, बी. डी. साखरे यांनी सहभाग नोंदविला.