दुचाकीचे नुकसान केल्याच्या संशयावरुन शिक्षकाने ३२ विद्यार्थ्यांना बांबूने झोडपले

या अमानुष मारहाणीत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.
latur news
दुचाकीचे नुकसान केल्याच्या संशयावरुन शिक्षकाने ३२ विद्यार्थ्यांना बांबूने झोडपलेfile photo
Published on
Updated on

Teacher beats 32 students with bamboo on suspicion of damaging a bike

लातूर : वृत्तसंस्था

लातूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या दुचाकीचे नुकसान केल्याच्या संशयावरून एका शिक्षकाने चक्क ३२ विद्यार्थ्यांना बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षक उज्ज्वल प्रकाश सोनी (मूळ गाव : बैतुल, मध्य प्रदेश) याला अटक केली आहे.

latur news
Latur Unseasonal Rain | निलंगा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळीची हजेरी; काढणीला आलेली पिके धोक्यात

ही घटना २१ फेब्रुवारीच्या रात्री अहमदपूर जवळील थोरलेवाडीतील ख्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या वसतिगृहात घडली. या वसतिगृहात इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी राहतात. वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी त्याच्या मोटारसायकलचे नुकसान केले आहे, असा संशय आरोपी शिक्षक उज्ज्वल प्रकाश सोनीला होता.

याच संशयावरून पछाडलेल्या शिक्षक सोनीने संयम सोडला. मध्यरात्रीच्या सुमारास सुमारे ३२ अल्पवयीन विद्यार्थ्यांना एकत्र करून बांबूच्या काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत अनेक विद्यार्थ्यांच्या पाठीवर आणि हातापायावर वळ उमटले असून, काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे आणि नंतर पालकांना ही माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाला वाचा पालकांच्या फुटली.

latur news
Latur News : पंचायत समिती लिपिकांचे कामबंद आंदोलन; नागरिकांची फरफट

दरम्यान, तक्रारीनंतर अहमदपूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. प्राचार्य जैवाबेरला प्रपीन नाडर (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शिक्षक उज्ज्वल सोनी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सोमवारी सोनी याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, शिक्षण विभागानेही या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news