Latur News : अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्या : माजी आमदार धीरज देशमुख

शेतकरी सन्मान निधीत वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
Latur News
Latur News : अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्या : माजी आमदार धीरज देशमुखFile Photo
Published on
Updated on

Take a decision on farmer loan waiver in the convention: Former MLA Dheeraj Deshmukh

लातूर, पुढारी वृत्तसेवा पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, शेतकरी सन्मान निधीत वाढ याबाबतचा अंतिम निर्णय घेऊन राज्य सरकारने कार्यवाही करावी आणि संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली.

Latur News
Latur News : चोरीच्या घटनांनी किनगाव हादरले; व्यापारी धास्तावले

पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार, असे आश्वासन महायुतीने निवडणुकीपूर्वी दिले होते.

शेतकरी सन्मान निधी योजनेतून मिळणाऱ्या निधीत ३ हजार रुपयांची वाढ करण्याचे वचनही दिले होते. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याची सध्या गरज असताना राज्य सरकारकडून या विषयांकडे दुर्लक्ष केले जात आहे. टाळाटाळ केली जात आहे, असे धीरज देशमुख यांनी सांगितले.

Latur News
Latur News : नवे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वीकारला पदभार

मागील महिन्यात अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांसमोर होते. आता पेरण्या झाल्यानंतर पाऊसच नाही. त्यामुळे पिके जगवायची कशी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. काही ठिकाणी तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे. पण, पेरणीसाठी जवळ पैसा नाही, अशी स्थिती आहे.

संकटाची ही मालिका संपत नसल्याने शेतकरी दरवर्षी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यात शेतीमालाला योग्य भाव नाही. लाखाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची ही व्यथा समजून घेऊन सरकारने सरसकट कर्जमाफी लागू करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी धिरज देशमुख यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news