

New Superintendent of Police Amol Tambe takes charge
लातूर, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून अमोल तांबे यांनी आज सोमवारी आपला पदभार स्वीकारला. नव्या पोलिस अधीक्षकांचे पोलिस प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. मावळते पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
लातूर जिल्ह्याचे मावळते पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांची पुणे येथे बदली झाली आहे. लातूर जिल्ह्यात खूप समाधानकारक काम करता आले जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक, जिल्हा पोलिस दलातील अधिकारी, अंमलदारानी भरपूर सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आपल्या निरोप समारंभात समाधान व्यक्त केले.
लातूर जिल्ह्यात खूप चांगला अनुभव मिळाला खूप काही शिकता आले याबद्दल सोमय मुंडे यांनी आवर्जून उल्लेख केला. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षकांचे स्वागत व मावळत्या पोलिस अधीक्षकांना निर ोपाचा कार्यक्रम पोलिस अधीक्षक कार्यालयच्या मीटिंग हॉल मध्ये झाला.
अपर पोलिस अधीक्षक डॉ अजय देवरे, पोलिस उपअधीक्षक गजानन भातलवंडे, यांचेसह लातूर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणे प्रभारी पोलिस अधिकारी पोलिस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. लातूरकरांच्या सहकार्यामुळे अनेक चांगले उपक्रम लातूर जिल्ह्यात राबविता आले. पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्याला चांगले सहकार्य दिले. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी कारवाया यावर वचक ठेवता आला, याबद्दल सोमय मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.