Latur Crime News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दुकानदारास जन्मठेपेची शिक्षा...

जिल्हा व सत्र न्यायाधीश उदगीर, श्रीमती आर. एम. कदम यांच्या न्यायालयाचा निकाल...
Latur Crime News
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दुकानदारास जन्मठेपेची शिक्षा... (File Photo)
Published on
Updated on

Shopkeeper sentenced to life imprisonment for sexually assaulting minor girl

उदगीर : पुढारी वृत्तसेवा

उदगीर तालुक्यात ८ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी शाळेतून घरी आल्यावर चॉकलेट खरेदी करण्यासाठी किराणा दुकानात गेलेल्या ९ वर्षे ३ महिने वयाच्या चिमुरडीवर दुकानदाराने घरातील खाेलीे नेऊन लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी गुरुवारी (१५ मे) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर.एम.कदम यांनी आरोपीस बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, २०१२ च्या कलम ६ अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरवले आले.

Latur Crime News
लातूर : उदगीर तालुक्यात वीज कोसळून ४ जनावरे दगावली; ६०० कोंबड्या वादळी वाऱ्यात मृत्युमुखी

आरोपीस जन्मठेपेची शिक्षा आणि २५,०००/- रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास आरोपीला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Latur Crime News
Latur News : चाकूरच्या नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी तुकाराम गोविंदराव जाधव (वय ६५ वर्ष ता.उदगीर) याने अल्पवयीन पीडित ही ८ डिसेंबर २०१७ रोजी चॉकलेट खरेदी करण्यासाठी किराणा दुकानात आली होती. आरोपी तथा किराणा दुकानदाराने मुलीवर घरातील खोलीत घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रा. पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द १० डिसेंबर २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विद्या अरुण जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला, त्यांनी घटनास्थळी भेट दिली, साक्षीदारांचे जबाब नोंदवले, घटनास्थळी पंचनामा केला आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७३ (यापुढे "सी.पी.सी." म्हणून संदर्भित) नुसार अंतिम अहवाल दाखल केला.

सदरील सत्र खटल्याची सुनावणी पिठासन अधिकारी सत्र न्यायाधीश श्रीमती आर.एम.कदम यांच्या न्यायदालनात झाली. सुनावणी दरम्यान सरकार पक्षाने एकुण १० साक्षिदारांची साक्ष तर बचाव पक्षाच्यावतीने एकाची साक्ष नोंदविण्यात आली. वरील सर्व साक्षिदारांनी सरकार पक्षाला सहकार्य केले. तसेच संचिकेतील कागदपत्रांच्या अनुषंगाने सहाय्यक सरकारी वकिल अॅड. शिवकुमार गिरवलकर यांनी सविस्तर असा युक्तीवाद सादर केला. त्‍या बाबींवरती जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उदगीर येथील पिठासन अधिकारी सत्र न्यायाधीश श्रीमती आर.एम.कदम यांनी गुरूवारी (१५ मे) रोजी आरोपी तुकाराम गोविंदराव जाधव यास बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, २०१२ च्या कलम ६ अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरवले.

आरोपीस जन्मठेपेची शिक्षा आणि २५,०००/- रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास आरोपीला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच कलम ३३(८) नुसार पीडितेला ५०,००० रुपये दंडाची रक्कम भरपाई म्हणून देण्यात यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news