Latur ZP Teachers Society Meeting| जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा ठरली वादळी, सभासदांच्या प्रश्नांवरून गोंधळ

Latur ZP Teachers Society Meeting- ऑडिटरच्या नियुक्तीवरूनही मतभेद, सभासदांची नाराजी
Latur ZP Teachers Society Meeting
Latur ZP Teachers Society MeetingAI image
Published on: 
Updated on: 

चाकूर (लातूर) - जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा विविध प्रश्नांमुळे वादळी ठरल्याची चर्चा असून त्यातच थकीत कर्जदार, लाभांश तसेच लेखापरीक्षकाच्या नियुक्तीवरून सभेत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा मोठ्या चवीने सुरु आहे.

येथील एका कार्यालयात शनिवारी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपा नेते गणेश हाके, अशोक गोविंदपूरकर, गटशिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे, निशिकांत मिरकले, पतसंस्थेचे अध्यक्ष बालाजी येळापुरे, उपाध्यक्ष चंद्रकांत भोजणे, सचिव प्रल्हाद इगे, माजी अध्यक्ष शरद हुडगे, खजिनदार राम कवाळे यांच्यासह संचालक मंडळातील पदाधिकारी, शिक्षक, सभासद उपस्थित होते.

स्वागत समारंभानंतर प्रत्यक्ष सभेला पावणे सहाला सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले. सभेपूर्वी भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याने भोजनानंतर सभेतील उपस्थितीवरही परिणाम झाल्याची चर्चा आहे.

सभेतील कामकाजादरम्यान मागील वर्षीच्या विषयांना मंजुरी देण्याच्या मुद्द्यावरून सभासदांनी प्रथम मागील विषयांना एकमताने मंजुरी देऊन त्यानंतर चालू वर्षाचे विषय घेण्याची मागणी केली. त्यानंतर एका सभासदाने थकीत कर्जदारांमुळे पतसंस्थेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत असून त्याचा लाभांशावर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

या प्रश्नावरून सभासद आणि सचिव यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिवांनी प्रश्नाला अपेक्षित पद्धतीने उत्तर न देता अरेरावीची भाषा केल्याचा आरोप संबंधित सभासदांनी केला. दरम्यान, दुसऱ्या सभासदाच्या प्रश्नावर बोलतांना त्यालाही तसेच उत्तर दिल्याने सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या सभेत सभासदांनी शासकीय ऑडिटरच्या नियुक्तीची मागणी अधिक लावून धरल्याने संचालक मंडळाची चांगलीच कोंडी झाल्याने त्यांच्या भूमिकेबाबत तर्क-वितर्क काढले जात आहेत. शासकीय ऑडिटरमुळे सभासद आणि संचालक मंडळामध्ये मतभेद निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. या मुद्द्यावरून सभेत चांगलीच चर्चा रंगली.

सभासदांच्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे देणे, संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची माहिती सभासदांसमोर पारदर्शकपणे ठेवणे आणि सर्वसाधारण सभेचे कामकाज नियमानुसार पार पाडणे ही संचालक मंडळाची जबाबदारी असल्याने या प्रकरणाकडे आता तालुक्यातील शिक्षक, सभासदांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान झालेल्या प्रकाराबाबत सचिव प्रल्हाद इगे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी दुजोरा दिला नाही. पतसंस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही सभासद राजकारण करीत आहेत. गत वर्षीपेक्षा २ टक्के नफा वाढ झाला आहे. ७५ टक्के थकबाकी वसुली झाली आहे. काही लोक जाणीवपूर्वक विरोध दर्शवीत आहेत. संस्थेचे हित होईल असे सर्वांनी वागले पाहिजे असे 'दै. पुढारी'शी बोलताना संगितले.

Latur ZP Teachers Society Meeting
Nilanga Congress Protest | निलंग्यात काँग्रेसने केली दुष्काळ जीआरची होळी

नियोजनाचा अभाव आणि सभासदांची उदासीनता यामुळे काही निमंत्रित मान्यवर, राजकीय नेते व अधिकारी उपस्थित राहिले नसल्याची चर्चा सभासदांमध्ये दबक्या आवाजात सुरू होती. वार्षिक अहवालात अध्यक्ष बालाजी येळापुरे यांनी संस्थेचा अहवाल सादर केला. मात्र, प्रश्नोत्तराच्या वेळी निर्माण झालेला वाद यामुळे सभेच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

Latur ZP Teachers Society Meeting
Devendra Fadnavis Latur visit : देवाभाऊंनी शब्द पाळला, शिवेंद्रबाबांनी पालकत्व निभावले

वार्षिक सर्वसाधारण सभेतच सभासदांच्या प्रश्नांवरून वाद निर्माण होणे ही बाब संस्थेच्या संचालक मंडळासाठी चिंतनाची ठरणार आहे. त्यामुळे सभेतील निर्णय, लेखापरीक्षणाबाबतची भूमिका आणि सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संचालक मंडळ काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news