

Ruddha double murder case solved in eight hours; Ahmedpur police's success
अहमदपूर, पुढारी वृत्तसेवाः रूध्दा शिवारात ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा अवघ्या ८ तासांत करण्यात अहमदपूर पोलिसांना यश आले आहे. नरसिंग भाऊराव शिंदे (६०) आणि केरबा नरसिंग शिंदे (२१) अशी आरोपींची नावे असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
रूध्दा शिवारात आखाड्यावर झोपलेले शिवराज निवृत्ती सुरनर (७०) व त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरनर (२०) या बापलेकाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. शेतीच्या आर्थिक मोबदल्याच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे उघड झाले आहे.
तीस वर्षांपूर्वी नरसिंग शिंदे (रा. रूध्दा, हल्ली करेवाडी, ता. लोहा) यांनी आपली शेती मृत शिवराज सुरनर यांच्या नावावर केली होती. मात्र अलीकडे ती परत स्वतः च्या नावावर करून देण्याची मागणी केली असता सुरनर बापलेकाने नकार दिला.
या रागातून नरसिंग शिंदे आणि त्याचा मुलगा केरबा शिंदे यांनी ३ नोव्हेंबरच्या रात्री दोघांवर प्राणघातक हल्ला करून हत्या केली. नंतर आर ोपींनी अपघाताचा बनाव करण्यासाठी मृतदेहावर दुचाकी टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल सीडीआर व गुप्त माहितीच्या आधारे नरसिंग भाऊराव शिंदे आणि केरबा नरसिंग शिंदेया दोघांना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोले यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. आर- ोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळविण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार करत आहेत.