

Raids on hand-made liquor shops, illegal liquor sale
लातूर, पुढारी वृतसेवा : जिल्ह्यात विविध ठिकाणच्या हातभट्टी अड्ड्यांवर, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यावर छापेमारी करीत पोलिसांनी ४१ गुन्हे दाखल केले. या कार्यवाहीत ०६ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परत दिनांक १४ जून रोजी शनिवारी पहाटे मासरेड चे आयोजन करून लातूर जिल्ह्यातील हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणावर वरिष्ठांचे मार्गदर्शनात जोरदार कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणाऱ्या, देशी विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या ४३ लोकांवर ४१ गुन्हे दाखल करून ०६ लाख ४४ हजार ८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त व हातभट्टीच्या मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
ही कार्यवाहीत २८ पोलीस अधिकारी, १२३ पोलीस अमलदारांचे विशेष पथकांचा सहभाग होता. हातभट्टी, हातभट्टीचे रसायन, हजारो लिटर देशी व विदेशी दारू असा एकूण ०६ लाख ४४ हजार ८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त, करण्यात आसा तसेच हजारो लिटर हातभट्टी दारू व हातभट्टीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे.