Latur News : देवणीत अवैध सावकारी विरोधात तीन ठिकाणी धाडी

सहकार विभाग, पोलिसांची संयुक्त कारवाई; हिशोब वह्या, दस्तऐवज ताब्यात
Latur News
Latur News : देवणीत अवैध सावकारी विरोधात तीन ठिकाणी धाडीfile photo
Published on: 
Updated on: 

Raids conducted at three places against illegal moneylending in Deoni

लातूर, पुढारी वृत्तसेवा : सहकार विभागाकडे प्राप्त तक्रारीच्या आधारे देवणी तालुक्यातील वलांडी व कवठाळा येथे कथित अवैध सावकारीप्रकरणी सहकार विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधवारी (दि. ३०) तीन ठिकाणी एकाचवेळी झडती घेतली. वलांडी येथील पांडुरंग रामचंद्र पांचाळ यांच्या वलांडी व कवठाळा येथील राहत्या घरांसह वलांडी येथील श्रीराम मोबाईल शॉपचा यात समावेश आहे.

Latur News
Chakur Crime | ग्राम महसूल अधिकाऱ्याला मारहाण; ५ ऑक्टोबरपासून काम बंदचा इशारा

जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड व पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण आणि जिल्हा उपनिबंधक विष्णू पोतंगले यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. पथक प्रमुख म्हणून दीपक कांबळे, श्याम जाधव आणि रवी गायकवाड यांनी काम पाहिले.

कारवाईदरम्यान पोलिस व सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. झडतीदरम्यान कथित अवैध सावकारी व्यवहाराशी संबंधित हिशोब वह्या तसेच खरेदी-विक्रीचे विविध दस्तऐवज पथकाने ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करून पुढील चौकशी करण्यात येत आहे. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम १६ अन्वये या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सहकार विभागाने सांगितले.

देवणी तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारी व्यवहारांची माहिती सहकार विभागाच्या जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे किंवा संबंधित तालुक्यातील सहायक निबंधक कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Latur News
Latur News : पाणंद रस्त्याच्या वादातून दुहेरी खून

माहिती देणाऱ्या तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. अवैध सावकारीविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे देवणीचे सहायक निबंधक एम. डी. कच्छवे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news