Latur News : १६ कि. मी. धावत राहुलने गाठले कॉलेज

पहिला दिवस संस्मरणीय; एक धाव शिक्षणासह, आरोग्यासाठी
Latur News
Latur News : १६ कि. मी. धावत राहुलने गाठले कॉलेजFile Photo
Published on
Updated on

Rahul reached college by running 16 km.

लातूर, पुढारी वृतसेवा : व्यायमाचे महत्व, शिक्षण व आरोग्यविषयक जनजागृती व्हावी या उद्देशाने समाजातील वंचित विद्यार्थ्यांसाठीच्या माणूस प्रतिष्ठान संचलित 'माझं घर' प्रकल्पातील राहुल राठोड या अकरावीत प्रवेश घेतलेल्या दयानंद कला महाविद्यालयाच्या विद्याथ्यनि बुधवारी (२३ जुलै) सोळा किमी धावत महाविद्यालयातील पहिला दिवस साजरा केला आहे.

Latur News
Latur Crime News : सुरज चव्हाण पोलिसांना शरण

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राबविण्यात येणारा 'एक धाव आरोग्यासाठी, शिक्षणासाठी' असे घोषवाक्य असलेला हा अनोखा उपक्रम शिक्षण व आरोग्य जनजागृती व्हावी यासाठी राहुलने माझं घर ते दयानंद कला महाविद्यालय, लातूर हे अंतर १ तास १५ मिनिटांमध्ये कोणतीही सार्वजनिक वाहतूक न घेता पूर्ण धावत पार केले.

शरीरसामर्थ्य, मनोबल आणि शिक्षणा-वरील निष्ठा यांचा उत्तम संगम त्याच्या या घावण्यातून दिसून आला. डॉ दिलीप नागरगोजे, डॉ. प्रशांत दीक्षित, डॉ संदीप जगदाळे, प्रा. अनिल भुरे, प्रा सिद्धार्थ भालेराव यांनी राहुलचे स्वागत केले. नंतर राहुलने धावायला सुरुवात केली.

Latur News
उपमुख्यमंत्री अजित पवार भेटणार का? मारहाणीनंतर जखमी छावा संघटनेचे अध्यक्ष रुग्णवाहिकेतून थेट पवारांच्या भेटीला

लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयात दाखल होताच त्याचे सहाय्यक शिक्षण संचालक संजय पंचगल्ले, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी पुष्पगुच्छ बेंग रजिस्टर देवून स्वागत केले. विद्यार्थ्यांनीही त्याचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ. अंजली जोशी, डॉ. दिलीप नागरगोजे, शरद झरे, राजेंद्र कासार, डॉ. विनोद चव्हाणयांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. दिनेश जोशी यांनी केले.

शरद व संगीता झरे यांनी 'माझं घर' हा प्रकल्प सहा वर्षांपूर्वी शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी सुरू केला. राहुल राठोड हा या प्रकल्पातील पहिला विद्यार्थी आहे. त्याचे आई वडील ऊसतोड कामगार आहेत. सहा वर्षांपासून तो माझं घर मध्ये राहून शिक्षण घेत आहे. राहुलला शिक्षणाची व व्यायामाची प्रचंड आवड असून ऑलम्पिक पर्यंत पोहचून देशासाठी खेळण्याची आयपीएस होऊन पोलिस दलात काम करायची इच्छा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news