

Only one ambulance in Chakur taluka
संग्राम वाघमारे
चाकूर संपूर्ण तालुक्याची आरोग्यसेवा फक्त एका रुग्णवाहिकेवर अवलंबून असल्यामुळे तालुक्यातील रुग्णांची गैरसोय होत असून आरोग्यसेवा बोकाळलेली आहे. चाकूर तालुक्यातील रुग्णांना आरोग्य सुविधा अधिक गतीने मिळाव्यात म्हणून आमदार खासदार स्थानिक विकास निधीतून दोन रुग्णवाहिका आरोग्यसेवेत दाखल झाल्या होत्या. परंतु त्या अनेक दिवसांपासून चालकाअभावी बंद असल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत आहे.
ग्रामीण रुग्णालयांतील एका १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर संपूर्ण तालुक्याचा अधिकचा भार असल्यामुळे रुग्णांना आरोग्यसेवा वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका ही जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील गरोदर मातांना व जन्म झाल्यापासून १ वर्षापर्यंतच्या बाळांना मोफत सुविधा या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून दिल्या जातात. आजारानुसार रुग्णांस लातूरला घेऊन जाण्याची मोफत सेवा ही रुग्णवाहिका करत असते. गेली अनेक दिवसांपासून या रुग्णवाहिका रुग्णालयातच थांबून असल्याने याचा आरोग्य सेवेवर परिणाम झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामीण रुग्णालयांत या दोन रुग्णवाहिकेवर सेवा देण्यासाठी कंत्राटी चालकांची करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेली होती.
चालक पुरवठा करण्याचे कंत्राट संपुष्टात आले आहे. त्यामुळे रुग्णालयांतील दोन रुग्णवाहिका चालकांमुळे जागेवर थांबून असल्यामुळे तालुक्यातील गर रोदर माता व जन्म झाल्यापासून १ वर्षापर्यंतच्या बाळांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून घरून हॉस्पिटलमध्ये व हॉस्पिटलमधून घरापर्यंतच्या सुविधा मिळत नसल्याने गैरसोय वाढलेली आहे.
१०८ या रुग्णवाहिकेला संपूर्ण तालुक्यातील रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णाला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूरला घेऊन जाण्यासाठी फक्त एक रुग्णवाहिका आहे. तेही वेळेत उपलब्ध होत नसते. त्यामुळे रुग्र्णाना आरोग्यसेवा वेळेत मिळणे शक्य होत नाही. अतिगंभीर रुग्णांना रुग्णवाहिकांच्या माध्यमातून लातूरला रेफेर करणे सोयीचे होत नसल्याने त्याचा परिणाम रुग्णांवर होत आहे.
त्यासाठी रुग्णवाहिका चालकांची लवकरात लवकर भरती करावी आणि थांबून असलेल्या १०२ च्या दोन रुग्णवाहिका सुरू करून आरोग्यसेवा बळकट कराबी अशा मागणीने जोर धरला आहे. ग्रामीण रुग्णालयांतील दोन रुग्णवाहिका चालका अभावी थांबून असून या चालकांची लवकरात लवकर नेमणूक करावी, चालकावर आलेली उपासमारीची वेळ थांबवावी अशी मागणी चालकाकडून होत आहे.