

Online buffer stock of urea fertilizer; but there is a shortage in the market!
निलंगा, पुढारी वृत्तसेवा तालुक्यात सध्या युरिया खताचा तुटवडा तीव्र स्वरूपात जाणवत असून, हा तुटवडा नैसर्गिक आहे की कृत्रिम, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. कृषी विभागाच्या ऑनलाइन ब्लॉक प्रणालीवर तालुक्यात युरिया खताचा मोठ्या प्रमाणात बफर स्टॉक उपलब्ध असल्याची नोंद असतानाही प्रत्यक्षात कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांना खत मिळत नाही.
निलंगा तालुका ऊस, गहू तसेच इतर पिकांच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. सध्या साखर कारखाने सुरू असून शेतकरी ऊसतोड करून कारखान्याला ऊस पुरवठा करत आहेत. ऊस तोडीनंतर नवीन खोडवा उसाला युरिया खताची अत्यंत गरज असते.
याशिवाय गह, वैरण पिके तसेच इतर रब्बी पिकांसाठीही युरियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. युरिया खतामुळे पिकांना नायट्रोजन मिळून पिकांची जोमदार वाढ होते, पाने हिरवीगार राहतात आणि उत्पादन वाढीस मदत होते. स्वस्त व लवकर परिणाम देणारे खात असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर युरियावर अवलंबून असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतकरी युरिया खरेदीसाठी बाजारात गेले असता खत नाही, रॅक लागलेला नाही, माल आलेला नाही, अशी उत्तरे कृषी दुकानदारांकडून मिळत आहेत.
काही ठिकाणी तर युरिया देण्यासाठी इतर महागडी खते, लिक्विड खते किंवा फवारणीची औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे हातचा गेला असून, आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामातून चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, पिकांसाठी खतेच मिळत नसल्याने शेतकरी कृषी सेवा केंद्रांकडे चकरा मारत आहेत. ऊस व गहू पिकासाठी युरियाची अत्यंत गरज आहे. मात्र बाजारात खत मिळत नाही. ज्या ठिकाणी खत आहे.
तिथे इतर खते घेण्याची सक्ती केली जाते. दुकानदारांकडून खत देण्यास टाळाटाळ कृषी विभागाच्या ऑनलाइन नोंदीनुसार निलंगा तालुक्यातील सुमारे १०१ कृषी सेवा केंद्रांकडे तब्बल १९ हजार १४१ बंग युरिया उपलब्ध असल्याचे दिसते. ही माहिती ई-पॉस मशीनवर अद्ययावत असतानाही प्रत्यक्षात दुकानदारांकडून खत देण्यास टाळाटाळ केली जात आहे. एवढा साठा असूनही शेतकऱ्यांना खत मिळत नसेल, तर यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नेमकी कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर खत मिळावा, अशी मागणी शेतकरी लिंबाजी मगर, फयाज मोमीन, शब्बीर शेख, नागनाथ कांबळे, बाळूभाऊ हासबे आदींनी केली आहे.
दुकानदारांकडून खत देण्यास टाळाटाळ
कृषी विभागाच्या ऑनलाइन नोंदीनुसार निलंगा तालुक्यातील सुमारे १०१ कृषी सेवा केंद्रांकडे तब्बल १९ हजार १४१ बंग युरिया उपलब्ध असल्याचे दिसते. ही माहिती ई-पॉस मशीनवर अद्ययावत असतानाही प्रत्यक्षात दुकानदारांकडून खत देण्यास टाळाटाळ केली जात आहे. एवढा साठा असूनही शेतकऱ्यांना खत मिळत नसेल, तर यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नेमकी कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.