Nagpanchami Special : नवसाला पावणारा नागझरीचा नागोबा

नागझरीत सर्पदंशाने एकाचाही मृत्यू नाही, गावकऱ्यांची श्रध्दा
नवसाला पावणारा नागझरीचा नागोबा
नवसाला पावणारा नागझरीचा नागोबाfile photo
Published on
Updated on

No one died due to snakebite in Nagajri, villagers are confident

नरसिंग सांगवीकर

अहमदपूर : अहमदपूर तालुक्यातील नागझरी गावातील श्री नागनाथ महाराज अर्थात नागोबा देवस्थान हे मराठवाड्यातील जागृत आणि नवसाला पावणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. नागदेवतेवरील श्रद्धेमुळे नागपंचमीच्या दिवशी गावात मोठी यात्रा भरते. या गावाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये अशी दृढ श्रद्धा आहे की, नागदेवतेच्या कृपेमुळे आजपर्यंत गावात सर्पदंशाने एकाही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही.

नवसाला पावणारा नागझरीचा नागोबा
Latur News | वंदे मातरमच्या मुद्द्यावरून लातूरमध्ये भाजप-काँग्रेस आमनेसामने!

नागझरी गावाची ओळख प्राचीन श्री नागनाथ महाराज मंदिरामुळे आहे. अनेक पिढ्यांपासून येथे नागदेवतेची पूजा-अर्चा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी लातूरसह नांदेड, बीड, परभणी आणि परिसरातील जिल्ह्यांतून भाविक दर्शनासाठी येतात. नागोबाला नैवेद्य अर्पण करून नवस बोलण्याची तसेच पूर्ण झालेला नवस फेडण्याची परंपरा येथे आहे.

नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त गावाबाहेर राहणारे नागझरीतील नागरिकही नागपंचमीच्या निमित्ताने कुटुंबासह आवर्जून गावी येतात. त्यामुळे पंचमीच्या दिवशी गावात मोठी गर्दी होते. दिवसभर पूजा, दर्शन, भजन-कीर्तन, पालखी आणि महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम होतात.

नवसाला पावणारा नागझरीचा नागोबा
Latur News : आपत्कालीन हेल्पलाइनचा गैरवापर : ११२ वर 'टाईमपास' कॉल; उदगीरमधील प्रकार

नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी येथे भव्य कुस्ती मैदान भरविले जाते. महाराष्ट्रातील विविध भागांतून नामांकित पैलवान या कुस्ती स्पर्धेत सहभागी होतात. हजारो नागरिक कुस्त्यांचा आनंद घेतात. त्यामुळे धार्मिक परंपरेसोबतच नागझरीची यात्रा ग्रामीण क्रीडा संस्कृतीचेही केंद्र बनली आहे. श्री नागनाथ महाराज नवसाला पावतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक पुन्हा मंदिरात येऊन दर्शन घेतात आणि नवस फेडतात.

गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मते, नागदेवतेच्या आशीर्वादामुळे सर्पदंशाने गावात कोणाचाही मृत्यू झालेला नाही, ही श्रद्धा नागदेवतेवरील ग्रामस्थांच्या विश्वासाचे प्रतीक मानली जाते. नागझरीचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसाही समृद्ध आहे. शेती हा गावातील प्रमुख व्यवसाय असून ज्वारी, तूर, सोयाबीन, हरभरा आदी पिके घेतली जातात. शिक्षणाच्या क्षेत्रातही गावाने प्रगती केली असून विविध क्षेत्रांत अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, अभियंते, पोलीस आणि सैनिक म्हणून अनेक ग्रामस्थ कार्यरत आहेत. श्रद्धा, परंपरा, सामाजिक ऐक्य, शिक्षण आणि क्रीडा यांचा संगम असलेली नागझरीची नागपंचमी श्रद्धेचे केंद्र म्हणून ओळखले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news