Nilkantheshwar Temple : निलंग्याच्या निळकंठेश्वर मंदिराला मिळणार राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा

माजी मंत्री, आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा पाठपुरावा कामी
Nilkantheshwar Temple
Nilkantheshwar Temple : निलंग्याच्या निळकंठेश्वर मंदिराला मिळणार राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा File Photo
Published on
Updated on

Nilanga's Nilkantheshwar Temple to get state protected monument status

लातूर, पुढारी वृत्तसेवा : निलंगा शहराचे ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिर ऐतिहासिक असून याची ओळख दक्षिण काशी म्हणूनही आहे. शेकडो वर्षाचा इतिहास असलेल्या या मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली होती. या संदर्भात राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट घेवून माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी निळकंठेश्वर मंदिराची संपूर्ण माहिती दिली. यावेळी शेलार यांनी तात्काळ याबाबत सकारात्मकता दाखवत निळकंठेश्वर मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता निलंग्याच्या निळकंठेश्वर मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळून हा ऐतिहासिक वारसा जपला जाणार आहे.

Nilkantheshwar Temple
NHM : कुटुंब कल्याण अन् लसीकरणात लातूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

निलंग्याचे ग्रामदैवत असलेले निळकंठेश्वर मंदिराची उभारणी चालुक्यांच्या काळात झाली असून हे मंदिर म्हणजे स्थापत्य आणि मूर्तीकलेचा उत्कृष्ट नमूना आहे. या मंदिरात दोन गर्भगृह असून मुख्य गर्भगृहात शिवलिंग स्थापित झाले आहे. तसेच दुसया गर्भगृहात अतिशय दूर्मिळ मानली जाणारी उमा महेश्वर यांची मूर्ती आहे. मंदिराच्या बाह्यभागावर शंभरहून अधिक विलोभनिय शिल्पमूर्ती कोरलेल्या असून यामध्ये शिव, विष्णू, महिशासूर मर्दिनी यासारख्या देवतांसह सूर सुंदरीच्या प्रतिमांचा समावेश आहे. मंदिराच्या दर्शनासाठी आणि मंदीर पाहण्यासाठी लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील अनेक भाविक सातत्याने निलंगा येथे येत असतात.

श्रावण महिन्यात तर कर्नाटकातूनही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. काळाच्या ओघात या मंदिराची थोडीफार झालेली झिज लक्षात घेवून आणि या मंदीराचे मूळ रूप परत आणण्यासाठी माजी मंत्री आ. निलंगेकर यांच्या माध्यमातून या मंदिराच्या संवर्धनाचे काम पुरातन खात्याच्या वतीने सुरू झाले आहे. याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून अकरा कोटी तेविस लाखांचा विशेष निधीही उपलब्ध करून देण्यात आ-लेला आहे. विशेष म्हणजे या मंदिराच्या लगतच दुर्मिळ अशा खार-वणी व गोडवणी अशी दोन बारवा आहेत. ऐकमेकांना लागून असलेल्या या दोन जलस्त्रोतापैकी एकात गोड तर दुसयात खारे पाणी आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व चमत्कारिक असलेल्या या बारवांचेही जतन होणे तितकेच आवश्यक असल्याचे माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या निदर्शनास आणून दिले.

Nilkantheshwar Temple
Latur Agriculture News : सोयाबीनच्या काढणीला आला वेग, मजुरांची चणचण

निळकंठेश्वर मंदिर आपल्या शहराचा आत्मा असून हजारो वर्षापासून श्रध्दा, इतिहास आणि कला या त्रिवेणीचा सगंम येथे असल्याचे सांगितले. हा ऐतिहासिक आणि पुरातन ठेवा जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्यामुळे या मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता,. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी यास मान्यता दिल्याबद्दल त्यांचे आभार या निर्णयामुळे निळकंठेश्वर मंदिर केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर मराठवाडा आणि राज्याच्या नकाशावर झळकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news