Sambhaji Patil Nilangekar : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्पर कार्यवाही करावी

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या आढावा बैठकीत सूचना
Nilanga water shortage warning Latur
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकायांच्या उपस्थितीत पाणी टंचाई आढवा बैठक घेतली.pudhari photo
Published on
Updated on

लातूर : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून मे महिन्यातही तापमान मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. परिणामी निलंगा मतदारसंघात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता असून मतदारसंघातील एकाही गावाला पाणी टंचाई भासणार नाही याची खबरदारी घेऊन पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्पर कार्यवाही करावी, अशी सूचना माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. लातूर येथील शासकीय विश्रामगृहात माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकायांच्या उपस्थितीत पाणी टंचाई आढवा बैठक घेतली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उषापाटील, निलंगा तहसिलदार प्रसाद कुलकर्णी, शिरुर अनंतपाळ तहसिलदार किशोर यादव, देवणी तहसिलदार सोमनाथ वाडकर यांच्यासह शिरुर अनंतपाळ पंचायत समितीचे सभापती संजय सूर्यवंशी, निलंगा पंचायत समिती सभापती सुनिता वाघमारे, देवणी पंचायत समिती सभापती अंकिता पाटील, निलंगा नगराध्यक्ष संजयराज हलगरकर, शिरुर अनंतपाळ नगराध्यक्ष रतन शिवणे आदींसह प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.

Nilanga water shortage warning Latur
Radhakrishna Vikhe Patil : डावा कालवा दुरुस्तीचे काम दीड वर्षात होणार

लातूर जिल्हा पाणीटंचाईग्रस्त म्हणून ओळखला जात असला तरी पाणीटंचाईचा हा काळा पुसण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने महायुती सरकारकडून होत असल्याचे सांगून माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदार संघात पाणीटंचाई फारशी जाणवत नसल्याचे स्पष्ट केले.

यापूर्वी निलंगा मतदारसंघात सिंचनाचे व पाणीपुरवठ्याचे काम अतिशय नियोजनबध्द केले असल्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे सांगितले. मात्र सध्या तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असून मे महिन्यातही तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता हवामन खात्याने वर्तविली आहे.त्यामुळे मतदारसंघात पाणीटंचाई उद्भवणार नाही यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस पाऊले उचलून नियोजन आराखडा तयार करावा, अशी सूचना देत मतदारसंघातील प्रत्येक गावात सध्या पाण्याची परिस्थिती काय आहे याबाबत माहिती घेवून ज्या ठिकाणी पाणीटंचाई उद्भावणार आहे तेथे कोणत्या उपाययोजना करणे अपेक्षित आहे त्या पूर्ण करून घ्याव्यात, अशाही सूचना आ. निलंगेकर यांनी दिल्या.

Nilanga water shortage warning Latur
Shivendrasinhraje Bhosale : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सज्ज राहावे

प्रत्येक गावातील तलाठी, आणि ग्रामसेवक यांनी वेळोवेळी आढावा घेवून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चायाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच याबाबत प्रशासनास वेळोवेळी माहिती द्यावी, या माहितीच्या आधारे प्रशासनाने गांभीर्याने कार्यवाही करावी .त्याच बरोबर नागरिकांकडून येणाया पाणीटंचाईसह इतर तक्रांरींची वेळीच दखल घेवून त्याबाबत तत्काळ उपाययोजना व्हाव्यात असेही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सूचित केले.

बैठकीच्या सुरुवातीस तिन्ही तालुक्याच्या तहसिलदारांनी आपापल्या तालुक्यातील पाणीसाठा व संभाव्य पाणीटंचाईबाबत करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. यावेळी निलंगा बाजार समितीचे सभापती शिवकुमार चिंचनसुरे, देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटील, शिरुर अनंतपाळ बाजार समितीचे सभापती गोविंद चिलकुरे, निलंग्याचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, मंगेश पाटील, निलंगा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे,देवणी तालुकाध्यक्ष शिवराज बिरादार, शिरुर अनंतपाळ तालुकाध्यक्ष माधव बिरादार, माजी जि.प. सदस्य डॉ.संतोष वाघमारे,प्रशांत पाटील, संभाजी पाटील तळेगावकर, नागेश जिवणे, गणेश धुमाळे आदींची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news