Radhakrishna Vikhe Patil : डावा कालवा दुरुस्तीचे काम दीड वर्षात होणार

मंत्री विखे पाटील यांची माहिती, गळती थांबवून १५ टीएमसी पाण्याची बचत
Radhakrishna Vikhe Patil News
Radhakrishna Vikhe PatilPudhari
Published on
Updated on

Repair work on the Left Canal will be completed within one and a half years

पैठण, पुढारी वृत्तसेवा :

जायकवाडी प्रकल्पाच्या उजवा कालवा दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच डाव्या कालव्याचे संपूर्ण दुरुस्तीचे काम हाती घेण्याची सर्व प्रक्रिया सुरू केली जाईल. यासंदर्भात निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून, कालवा दुरुस्तीचे काम येणाऱ्या दीड वर्षात पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. यामुळे कालव्याची गळती थांबून १५ टीएमसी पाण्याची बचत होणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. पैठण येथे बुधवारी (दि.८) आयोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

Radhakrishna Vikhe Patil News
Ashti water crisis issue : आष्टीत ‌‘विकासा‌’ची धुळवड; पाण्यासाठी दोन माजी आमदार एकवटले

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, खा. कल्याण काळे, खा. रामराव वडकुते, माजी मंत्री राजेश टोपे, आ. प्रशांत बंब, आ. हिकमत उढाण, आ. रमेश बोरणारे, आ. विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता शिंगाडे, कार्यकारी अभियंता प्रशांत संत, उपअभियंता निंबाळकर, धरण शाखा अभियंता मंगेश शेलार, उद्यान विभागाचे उपअभियंता दीपक डोंगरे, तुषार बाविस्कर यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाडा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वागत आमदार विलास भुमरे यांनी केले. तर बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सल्लागार समितीचे सदस्य आमदार यांचे स्वागत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी करून पाणी नियोजनासंदर्भात माहिती जाणून घेतली.

Radhakrishna Vikhe Patil News
Sambhajinagar news : शहरवासीयांना दोन महिन्यांत मिळेल मुबलक पाणी

यावेळी जायकवाडी प्रकल्प नाथसागर धरणाचा सुवर्ण महोत्सव असल्यामुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी धरणावर केक कापून उपस्थित अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नायब तहसीलदार राहुल बनसोडे, तलाठी शीतल झिरपे, सीमा भोसले, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, पोलीस उपनिरीक्षक अजिज शेख, न प चे उपाध्यक्ष तुषार पाटील, भूषण कावसनकर, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, जीतसिंग करकोटक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नितीन विखे, राजूभाऊ गायकवाड, विनोद बोंबले, पं.स. उपसभापती संजय लगाने, जिल्हा परिषद सदस्य कृष्णा गिधाने, नाथ मंदिर कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे यांच्यासह विविध मान्यवर, शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पाणीप्रश्नांवर आमदारांची चर्चा

या प्रसंगी माजलगावचे आ. प्रकाश सोळंके यांनी बैठकीत ऑनलाईन पध्दतीने हजेरी लावून मंत्री विखे यांच्याकडे माजलगाव धरणामध्ये जायकवाडी प्रकल्पातून अधिक पाणी उपलब्ध करून देण्याची तसेच डावा व उजवा या दोन्ही कालव्यांतून सोडले जाणारे पाण्याचे रोटेशन समान ठेवण्याची मागणी केली. यासह अनेक उपस्थित आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील संभाव्य पाणीप्रश्नावर चर्चा करून अडचणी सोडविण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news