Shri Renuka Devi temple : रेणापूरच्या श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्रोत्सव, आज घटस्थापना
Navratri festival at Shri Renuka Devi temple in Renapur, Ghatasthapana today
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : रेणापूर येथील कुलदैवत व भक्तांचे आराध्य दैवत श्री रेणुका देवीच्या मंदिरात आज सोमवार, (दि. २२) तहसिलदार प्रशांत थोरात व ट्रस्टचे अध्यक्ष राम पाटील यांच्या हस्ते घटस्थापना केली जात आहे. नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ उत्साहाने कार्यरत आहेत.
या वर्षी मंदिर शिखराचे रंगकाम, मंडप सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, व्यवस्थेकरिता महिलां व पुरुषांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा व पोलिस व होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. दररोज भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात केले जाणार आहे. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत अनेक मान्यवरांच्या हस्ते दररोज महापुजा व रात्री आराधी मंडळांचे विविध कार्यक्रम घेण्यात येतात.
भाविक भक्तांना व्यवस्थीत दर्शन घेता यावे म्हणुन विश्वस्त मंडळाकडून मंदीर परिसरात विशेष सोय करण्यात आली असून सीसीटिव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. या वर्षी मंदिर शिखराचे कलरकाम करण्यात आले आहे. मंडप व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महिलां व पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा लागल्या जातात. यावेळी पोलिस व होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त ठेवला जातो. तसेच नवरात्रात दररोज भाविकांकडून महाप्रसाद वाटप केला जातो. नवरात्रोत्सवाची सांगता २ ऑक्टोबरला रात्री पालखी मिरवणूक सोहळ्याने होईल.
रेणापूर येथील श्री रेणुका देवीचे मोठे महात्म्य आहे. देवीच्या मंदिरासमोर पन्नास फुट उंचीची विटा सिमेंटने बांधलेली हलती दिपमाळ आहे. अनादी काळापासून हि दिपमाळ सहज हलविली तर ती हलते. देवीचे हे महात्म्य पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी दुरदुरचे भाविक नवर-ात्रोत्सवात येत असतात. विजयादशमीला रात्री देवीची पालखी मिरवणुक काढण्यात येते. या मिरवणुक सोहळ्यात हजारो भावीक व आराधी मंडळ सहभागी होतात. श्री रेणुका देवी विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ नऊ दिवस देवीच्या सेवेत कार्यरत असतात.

