Latur News : मनपा आयुक्त मानसी यांनी पदभार स्वीकारलाFile Photo
लातूर
Latur News : मनपा आयुक्त मानसी यांनी पदभार स्वीकारला
लातूर महापालीकेच्या आयुक्त म्हणून मानसी यांनी पदभार स्वीकारला.
Municipal Commissioner Mansi takes charge
लातूर, पुढारी वृत्तसेवा: लातूर महापालिच्या आयुक्त म्हणून मानसी यांनी शुक्रवारी (दि.१३) प्रभारी आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव यांच्याकडून पदभार स्वीकारला.
पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या जागेवर मानसी यांची बदली करण्यात आली आहे. यापूर्वी मानसी या गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे उपविभागीय महसूल अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्या लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मिना यांच्या पत्नी आहेत. पदभार स्विकारताच अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

