लातूर : मुलांना CBSE शिक्षण देता येत नसल्याने आईने मुलीसह संपवले जीवन

भाग्यश्री वेंकट हालसे-समीक्षा
भाग्यश्री वेंकट हालसे-समीक्षा

औराद शहाजानी (लातूर) : पुढारी वृत्तसेवा – निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी या गावातील महिलेने आपल्या पाच वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी मारून जीवन संपवले. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले आहे‌. सोमवारी (ता. १८जून) सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास भाग्यश्री वेंकट हालसे (वय-२६), समीक्षा वेंकट हालसे, (वय-५ दोघेही रा. माळेगाव) यांचा विहीरीत बुडून मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा –

आई भाग्यश्री यांनी मुलगी समीक्षाला सोबत घेऊन गावालगत असलेल्या केदार पाटील यांच्या विहिरीत उडी घेतली. सदरील घटनेची माहिती मिळताच औराद पोलिसांनी घटनास्थळाला तात्काळ भेट देऊन मृतदेह विहिरीतून काढून नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या महिलेचे पती देवणी तालुक्यातील गावात राहतात. औराद पोलीस ठाण्यात महिलेचे वडील अरूण बोडके यांच्या फिर्यादीवरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात करण्यात आली आहे.

अधिक वाचा –

मृत महिलेने आपले पती मुलांना सीबीएसई शाळेत शिक्षण देत नसल्याच्या कारणावरून नैराश्यातून आत्महत्या केली आहे, अशी चर्चा गावात आहे. परंतु याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही अथवा तिच्या कुटुंबीयांनी त्याबद्दल दुजोरा दिला नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे हे करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news