Latur News : आ. अभिमन्यू पवारांच्या पाठपुराव्याला यश; लातूरच्या रिंग रोडसह चार मोठे प्रकल्प मार्गी!

विकासाभिमुख ठरला नागपूर दौरा; गडकरींकडून लातूरला मोठी विकास भेट!
Latur News
Latur News : आ. अभिमन्यू पवारांच्या पाठपुराव्याला यश; लातूरच्या रिंग रोडसह चार मोठे प्रकल्प मार्गी! File Photo
Published on
Updated on

MLA Abhimanyu Pawar; Four major projects including Latur's ring road are on track!

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर शहराच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलवणारा ऐतिहासिक निर्णय (२३) रोजी नागपूरमध्ये घेण्यात आला आहे. देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लातूर शहराबाहेरून जाणाऱ्या ६० किमी लांबीच्या पर्यायी रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. आ. अभिमन्यू पवार यांनी नागपूर येथे गडकरी यांची भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या विकासकामांचा सविस्तर पाठपुरावा केला.

Latur News
Nilkantheshwar Temple : निलंग्याच्या निळकंठेश्वर मंदिराला मिळणार राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा

पेठ चांडेश्वर कव्हा -बाभळगाव - भातखेडा - खुलगापूर नांदगाव - रायवाडी - हरंगुळ खंडापूर - गंगापूर - पेठ या मागनि जाणारा ६० किमी लांबीचा पर्यायी रिंग रोड लातूर शहरातील वाढत्या वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे. या मार्गाला यापूर्वी राज्य मार्गाचा दर्जा देऊन ४८ किमी लांबीचे भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे.

उर्वरित १२ किमी भूसंपादनाची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश नितीन गडकरींनी बैठकीतूनच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना फोनवरून दिले. राज्य शासनाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर या रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्याची मंजुरी तत्काळ देण्यात येईल, असा शब्द गडकरींनी लातूरकरांना दिला.

Latur News
Latur accident: रात्रीच्या अंधारात काळ आला होता, पण वेळ नव्हती! थांबलेल्या टेम्पोला ट्रकची धडक, मोठा अनर्थ टळला

या निर्णयामुळे लातूर शहराच्या विकासाला मोठी गती मिळणार असून वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी निपटारा होणार आहे. यासोबतच आमदार अभिमन्यू पवार यांनी आशिव पाटी येथे रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भुयारी मार्ग उभारण्याची मागणी केली. आशिव मातोळा किल्लारी जेवरी नणंद या निळकंठेश्वर मार्गावर वाढत्या वाहतुकीचा आणि आशिव ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून गडकरींनी या कामास मंजुरी देण्याच्या लेखी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ दिल्या आहेत.

तेरणा नदीवरील उजनी पुलावर दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून वाहतूककोंडी निर्माण होते तसेच नालीअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर पुलाची पुनर्बाधणी व मोठी नाली बांधकामाचे काम यापूर्वीच मंजूर झाले असून या कामाला प्रत्यक्षात पुढील १५ दिवसांत सुरुवात करण्याचे आदेश गडकरींनी दूरध्वनीवरून संबंधित विभागाला दिले आहेत.

लातूर-औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील औसा शहरात होत असलेल्या वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामातही गती आली आहे. या उड्डाणपुलाचा डीपीआर तयार करण्यासाठी कन्सल्टंट कंपनी नेमण्यासाठी निविदा काढण्यात आली असून ३० ऑक्टोबर २०२५ ही अंतिम तारीख आहे. डीपीआर, अंदाजपत्रक, तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता प्रक्रिया पूर्ण करून ९ महिन्यांत उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आश्वासन गडकरींनी दिले आहे. त्यामुळे औसेकरांना अपेक्षित असलेला उड्डाणपूल आता साकाराच्या दिशेने वाटचाल करत आहे.

औसा मतदारसंघ आणि लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी ही भेट अतिशय फलदायी ठरली आहे. सर्व प्रकल्प प्रत्यक्षात पूर्णत्वास जाईपर्यंत माझा पाठपुरावा कायम राहील. या भेटीमुळे लातूर शहर आणि परिसरातील वाहतूक, पायाभूत सुविधा आणि विकासकामांना नवी ऊर्जा मिळाली असून जिल्हा आता अधिक सक्षम आणि प्रगत लातूरच्या दिशेने पुढे जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news