Best Sugar Factory : मांजरा साखर कारखान्यास डेक्कन शुगरचा 'बेस्ट शुगर फॅक्टरी २०२६' पुरस्कार

१०० टक्के हार्वेस्टरने ऊसतोड करणारा देशातील पहिला कारखाना; राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव
Best Sugar Factory
Best Sugar Factory मांजरा साखर कारखान्यास डेक्कन शुगरचा 'बेस्ट शुगर फॅक्टरी २०२६' पुरस्कारfile photo
Published on
Updated on

Manjra Sugar Factory 'Best Sugar Factory 2026' Award by Deccan Sugar

लातूर, पुढारी वृतसेवा : सहकार क्षेत्रातील साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लातूर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याला द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा 'बेस्ट शुगर फॅक्टरी 2026' विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याने सलग तीन वर्षे शंभर टक्के ऊसतोड केवळ हार्वेस्टरद्वारे करून देशात नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

Best Sugar Factory
Latur rainfall : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर चाकूर तालुक्यात पावसाची दमदार एंट्री

या पुरस्काराचे वितरण 8 ऑगस्ट 2026 रोजी पुणे येथील हटिल जे. डब्ल्यू, मेरियट येथे आयोजित 71 व्या वार्षिक परिषद व शुगर एक्स्पो इंडिया 2026 कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मजुरांची कमतरता, वाढलेले ऊसक्षेत्र आणि विलंबाने होणारी ऊसतोड यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून कारखान्याचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी हार्वेस्टरद्वारे ऊसतोडीचा अभिनव उपक्रम राबविला. जिल्हा बँकेच्या सहकार्याने कार्यक्षेत्रातील सभासद व होतकरू तरुणांना हार्वेस्टर उपलब्ध करून देण्यात आले.

त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी हार्वेस्टर खरेदीसाठी विशेष कर्जयोजना सुरू केली. या योजनेचा लाभ घेत अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचे हार्वेस्टर खरेदी करून ते कारखान्यास भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिले.

Best Sugar Factory
Namo Udyan : चाकूर न.पं. एमआयडीसीत साकारतेय 'नमो उद्यान'

सध्या मांजरा साखर कारखान्याकडे स्वतःचे 25 हार्वेस्टर असून, कारखान्याच्या हमीवर उपलब्ध करून दिलेले 55 हार्वेस्टर अशा एकूण 80 हार्वेस्टरच्या माध्यमातून 2025-26 च्या गाळप हंगामात शंभर टक्के ऊसतोड करण्यात आली. त्यामुळे 100 टक्के हार्वेस्टरद्वारे ऊसतोड करणारा देशातील पहिला साखर कारखाना म्हणून मांजरा साखर कारखान्याची नोंद झाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जाहीर झालेल्या 'बेस्ट शुगर फॅक्टरी 2026' विशेष पुरस्कारामुळे राज्यभरातून मांजरा साखर कारखान्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news