

'Low marks in NEET; Student ends life'
लातूर, पुढारी वृतसेवा: येथील कृषी महाविद्यालयाच्या एकलव्य वसतिगृहातील एका परप्रांतीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवले. दीपककुमार धनावत (२१) असे त्याचे नाव आहे. नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
नांदेड रोडवर असलेल्या कृषी महाविद्यालय परिसरातील एकलव्य वसतिगृहाच्या खोली क्रमांक ३१३ मध्ये दीपककुमार कुमावत राहत होता. तो बीएससी अॅग्री प्रथम वर्षात शिकत होता. तो रवतकल्याण, जि. सवाई माधवपूर (राजस्थान) येथील विद्यार्थी होता.
गुरुवारी सकाळी ३१३ क्रमांकाच्या खोलीत तो पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सफाई कर्मचाऱ्यांना आढळला. वसतिगृहाच्या एका खोलीत तीन विद्यार्थी राहातात, परंतु दीपककुमार राहत असेल्या खोलीतील विद्यार्थी खोलीत नव्हते.
यादरम्यानच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. दरम्यान त्याने नीट परीक्षा दिली होती. त्यात कमी गुण पडल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता त्याच्या खोलीत राहणाऱ्या मित्रांनी सांगितल्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.