Nilanga Congress Protest | निलंग्यात काँग्रेसने केली दुष्काळ जीआरची होळी

शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी यांची घोर निराशा दुष्काळाचा जीआर फसवा काँग्रेसचा आरोप
Nilanga Drought GR Protest
दुष्काळी परिस्थितीच्या शासन निर्णयाची (जीआर) काँग्रेसच्या वतीने होळी करण्यात आली.Pudhari
Published on: 
Updated on: 

Nilanga Drought GR Protest

​निलंगा : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या शासन निर्णयाची (जीआर) काँग्रेसच्या वतीने होळी करण्यात आली. शेतकरी सध्या तीव्र कोरड्या दुष्काळामुळे भीषण आर्थिक संकटात सापडला असताना, राज्य शासन केवळ कागदी घोडे नाचवून वेळकाढूपणा करत असल्याचा घणाघाती आरोप यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी केला आहे.

निलंगा ​तालुक्यात पावभावामुळे पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसमोर पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि आर्थिक मदतीचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येण्यापूर्वीच शासनाने तातडीने प्रत्यक्ष मदत जाहीर करून ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी उद्विग्न मागणी आंदोलकांनी केली.

Nilanga Drought GR Protest
Latur Crime News : कुंडली दोष दूर करण्याच्या नावाखाली मुलीवर अत्याचार

​आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:

​दुष्काळग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने थेट आर्थिक मदत दिली जावी.

​सर्व बाधित क्षेत्रातील पिकांचे तात्काळ आणि अचूक पंचनामे करण्यात यावेत.

​ग्रामीण भागात चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची तत्काळ व्यवस्था करावी.​शासनाने दुष्काळ निवारणासाठी पोकळ घोषणा न करता ठोस आणि प्रभावी उपाययोजना त्वरित लागू कराव्यात, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिला.

Nilanga Drought GR Protest
Latur Farmer Death | बोरवेल आटली, पिके करपली, कर्जफेडीच्या चिंतेने शेतकऱ्याने जीवन संपवले

तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे,सुधाकर पाटील, अजित माने, अंबादास जाधव, प्रमोद मरुरे, शिराज देशमुख, महेश देशमुख, रवी किशोर कारखानीस, प्रशांत वांजरवाडे, गिरीश पात्रे, गणेश पेटकर, बालाजी सूर्यवंशी, इस्माईल मनियार, तुषार सोमवंशी, विठ्ठल पाटील आधी काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news