Latur rain alert| लातूरमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट, शाळांना उद्या सुट्टी जाहीर

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची माहिती
Latur Rain Update
लातूरमध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीरPudhari File Photo
Published on
Updated on

लातूर : जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ६० पैकी २९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे नदी, ओढ्यांची पाणी पातळी वाढून रस्ते, पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास ४९ रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या (दि.२९) सुट्टी करण्यात आली.

Latur Rain Update
Ganeshotsav Rain Alert: गणेशोत्सवात राहणार हलका ते मध्यम पाऊस; आज पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

उद्या पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने जिल्ह्याला 'येलो अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना शुक्रवारी (दि.२९) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने दिली.

Latur Rain Update
Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा कहर बुधवारीही कायम, 20 जिल्ह्यात 'अलर्ट'; जोर कधी ओसरणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news