Udgir Crime | उदगीरमध्ये जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा; ३.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत

चार आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार
Crime News
crime news File Photo
Published on
Updated on

Udgir Gambling Raid

उदगीर : उदगीर शहरालगत जळकोट रोडवरील इंडिया नगर परिसरात सुरू असलेल्या 'तीरट' जुगार अड्ड्यावर उदगीर ग्रामीण पोलिसांनी रविवारी मध्यरात्री धाडसी छापा टाकत ३ लाख ७३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून चार आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.

या प्रकरणी पोलीस शिपाई युवराज बालाजी जाधव यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४३/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Latur Agriculture News : औसा तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरण्या रखडल्या

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी मध्यरात्री जळकोट रोडवरील धन्वंतरी हॉस्पिटलजवळ जागीरदार यांच्या शेतालगत असलेल्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला. तेथे काहीजण पैशांची हारजित लावून 'तीरट' जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

या कारवाईत वसीम दस्तगीर शेख (वय २५, रा. हावगीस्वामी मठ चौक, उदगीर) आणि आमेर बशीर हाश्मी (वय ३२, रा. दर्गा चौक, उदगीर) यांना ताब्यात घेण्यात आले. तर शकील राजमहम्मद लदाफ, बबलू खाजा सय्यद (दोघे रा. मुसा नगर), खाँजा युसुफ शेख (रा. पिंजार मशिद) आणि आशपाक बारी पटेल (रा. जळकोट रोड) हे पोलीस येताच अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

Crime News
Latur Agriculture News : जळकोट तालुक्यात पेरण्यांना प्रारंभ

छाप्यात चार दुचाकी, एक ऑटोरिक्षा, तीन मोबाईल, जुगाराचे साहित्य तसेच रोख रक्कम असा एकूण ३ लाख ७३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार केंद्रे करीत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. डी. गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शहरालगत सुरू असलेल्या अवैध 'तीरट' जुगार अड्ड्यावर झालेल्या या कारवाईमुळे जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news