Latur Farmer Death | बोरवेल आटली, पिके करपली, कर्जफेडीच्या चिंतेने शेतकऱ्याने जीवन संपवले

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव बोरी येथील शेतकऱ्याने कर्जफेडीच्या चिंतेत उचलले टोकाचे पाऊल
 Shirur Anantpal  Crop Damage
अंकुश काळे Pudhari
Published on: 
Updated on: 

Shirur Anantpal Crop Damage

शिरूर अनंतपाळ : पावसाने ओढ दिल्याने उभ्या पिकांचे नुकसान आणि कर्जफेडीची चिंता अशा दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील ३३ वर्षीय तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले. ही घटना शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव बोरी येथे गुरुवारी (दि. २५) घडली. अंकुश रमेश काळे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी शेतात गळफास घेऊन जीवन संपविले.

अंकुश काळे यांच्याकडे अवघी दोन एकर कोरडवाहू शेती होती. वृद्ध आई-वडील, पत्नी, आठ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी अशा सहा जणांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. शेतीतून मिळणारे उत्पन्न अपुरे असल्याने ते स्वतःच्या शेतीसोबतच गावातील इतर शेतकऱ्यांकडे सालगडी म्हणून मजुरीही करत होते.

 Shirur Anantpal  Crop Damage
Latur Crime News : कुंडली दोष दूर करण्याच्या नावाखाली मुलीवर अत्याचार

यंदा पावसाने पाठ फिरवल्याने त्यांच्या शेतातील पिके संकटात आली होती. बोरवेलच्या पाण्यावर पीक वाचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, २५ सप्टेंबरच्या रात्री भूजलपातळी खालावल्याने बोरवेल आटली. त्यामुळे उभे पीक डोळ्यांदेखत करपून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली.

काळे यांच्यावर एक लाख ४० हजार रुपयांचे कर्ज होते. पीक हातचे गेल्यानंतर कर्ज फेडायचे कसे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या चिंतेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

 Shirur Anantpal  Crop Damage
Latur News : 'जाऊ' च्या बांधावर गहीवर दाटला; मुख्यमंत्र्यांनी दिला धीर

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाकडून मिळणाऱ्या सानुग्रह मदतीसाठी महसूल विभागाकडून प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news