Latur News : 'जाऊ' च्या बांधावर गहीवर दाटला; मुख्यमंत्र्यांनी दिला धीर

अश्रू अनावर झालेल्या शेतकऱ्याला दिला आधार; मदतीचे आश्वासन
Latur News
Latur News : 'जाऊ' च्या बांधावर गहीवर दाटला; मुख्यमंत्र्यांनी दिला धीरfile photo
Published on
Updated on

Chief Minister Devendra Fadnavis on Wednesday visited the dam at Jau and Kharosa in Nilanga taluka to inspect the dried crops

निलंगा, पुढारी वृत्तसेवा : 'साहेब, पिकाला दाणाच भरला नाही... एवढे कष्ट करूनही हातात काहीच उरले नाही. गुरे-ढोरं कशी जगवायची?' पावसाने पाठ फिरवल्याने करपलेल्या शेतात उभ्या शेतकऱ्याच्या या आर्त शब्दांनी जाऊच्या बांधावरचे वातावरण गहिवरून गेले. व्यथा सांगताना नुर पटेल यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना मिठी मारत आक्रोश केला. फडणवीस यांनी त्यांचा हात हातात घेत, 'घाबरू नका, सरकार तुमच्यासोबत आहे,' असा धीर दिला.

Latur News
Devendra Fadnavis Crop Inspection | वाळलेलं सोयाबीन मुख्यमंत्र्यांच्या हाती देत शेतकऱ्यांना अश्रू अनावर; 'आभाळ फाटलंय साहेब... आता तुमचाच आधार'!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी निलंगा तालुक्यातील जाऊ आणि खरोसा येथे थेट बांधावर जाऊन वाळलेल्या पिकांची पाहणी केली. पावसाअभावी सोयाबीनसह खरीप पिकांचे झालेले नुकसान, कोरड्या पडलेल्या विहिरी, पाणीटंचाई तसेच जनावरांच्या चारा-पाण्याची समस्या त्यांनी जाणून घेतली.

यावेळी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यंदा लातूर जिल्ह्यात २०१५-१६च्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनसारखे मुख्य पीक हातातून गेले आहे. या संकटात एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. दुष्काळग्रस्त सर्व बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

Latur News
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणार

आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे आणि आवश्यक सहकार्य केले जाईल. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि इतर आवश्यक बाबींसाठीही शासन उपाययोजना करेल. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये; शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news