

रेणापूरः किरकोळ कारणावरून स्वतःच्या शेतात घनसरगाव येथे नवऱ्याने बायकोचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.असुन स्वतः रेनापुर पोलीस ठाण्यात येवून बायकोला मारल्याची पतीने कबुली दिली या घटनेने घनसरगावांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
रेनापुर तालुक्यातील घनसरगाव येथील चंद्रकांत बाबुराव मदने वय ५५ वर्ष हे आपल्या पत्नी सोबत घनसरगाव शिवारातील शेतात कामासाठी गेले होते त्या ठिकाणी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान चंद्रकांत मदने यांने पत्नी मीराबाई चंद्रकांत मदने ( वय ४५ ) हिला जेवन वाढण्यास सांगीतले तेव्हा बायकोने तुम्हीच हाताने घ्या असे म्हटल्यानंतर चंद्रकांतला बायकोच्या उलटे बोलण्याचा राग आला.
या किरकोळ कारणावरून दोघांचे भांडण व कुरबुर झाली त्याचे रूपांतर नंतर मारहाणीत झाले राग अनावर न झाल्याने चंद्रकांत मदने यांने जवळच असलेल्या कुऱ्हाडीने पत्नी मीराबाई चंद्रकांत मदने हिला डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून जबर जखमी केले.त्यात ती जमिनीवर पडली त्यानंतर पुन्हा चंद्रकांतने तिच्यावर सपासप कुऱ्हाडीचे घाव घातले त्यामुळे मीराबाई मदने यांचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीला जीवे मारल्यानंतर चंद्रकांत मदने हा रेनापुर पोलीस स्टेशन येथे स्वतः हजर झाला आणि घडलेली घटना पोलिसांना सांगितली.लागलीच पोलिसांनी घनसरगावचे पोलीस पाटील व मयताच्या मुलाला फोन करून घटनेची शहानिशा केली. घडलेली घटना खरी असल्याचे सांगितल्याने चंद्रकांत मदने यांना सोबत घेऊन बीट अंमलदार बालाजी डप्पडवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन स्पॉट पंचनामा केला. घटनास्थळी रेनापुर चाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौधर ,पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, पीएसआय डोईफोडे , बीट अंमलदार बालाजी डप्पडवाड यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास पोलीस करत असून चंद्रकांत बाबुराव मदने याच्याविरुद्ध रेनापुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.